घरमुंबईएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा; नालासोपाऱ्यतून शिवसेनेच्या तिकीटावर

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा; नालासोपाऱ्यतून शिवसेनेच्या तिकीटावर

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी आपल्या पोलीस सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला असून ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. येत्या विधानसभेत प्रदीप शर्मा हे शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी आपल्या पोलीस सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या हातात रिव्हॉल्वरऐवजी धनुष्यबाण किंवा कमळ येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र आता प्रदीप शर्मा हे नालासोपर्‍यातून विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा हे नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात सर्वाधीक उत्तर भारतीय नागरिक असल्यामुळे येथील मतांचा फायदा प्रदीप शर्मा यांना मिळून त्यांच्या रुपाने शिवसेनेला होऊ शकतो. तसेच नालासोपारा, वसई, विरार भागात असलेले भाई ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचे वर्चस्व मोडीच काढण्यासाठी शिवसेना ही एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीश शर्मा यांना रिंगणात उतरवत आहेत.

प्रदीप शर्मा यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतल्याची खात्रीलायकरित्या समजते. शर्मा इच्छुक असलेल्या अंधेरी पूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके हे आमदार आहेत. तर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक कमलेश राय हे देखील इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने शर्मा यांना नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवाल का, अशी विचारणा केली. सध्या नालासोपरामधून बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकून हे आमदार असून त्यांनी शिवसेनेच्या शिवसेनेच्या विवेक पंडीत यांचा २०१४ साली पराभव केला होता. मात्र शर्मा यांना शिवसेनेत घ्यायचे की भाजप तिकीटावर उभे करायचे याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपलं महानगरला सांगितले होते.

- Advertisement -

प्रदीप शर्मा यांनी ८ जुलै रोजी राजीनामा दिला आहे. प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे असून त्यांनी ११३ गुंडांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. अंधेरीमध्ये त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रदीप शर्मा मित्रमंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून समाजसेवेला देखील सुरुवात केली होती. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला नागपाड्यातील त्याच्या घरातून अटक केल्यानंतर प्रदीप शर्मा हे पुन्हा प्रकाशझोतात आले होते. प्रदीप शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने १८ जुलै २०१९ च्या अंकात दिले आहे. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रदीप शर्मांना तिकीट मिळण्याची खात्री!

एका डॅशिंग पोलीस अधिकार्‍याप्रमाणे राजकारणातही ते आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या हातात रिव्हॉल्वरऐवजी धनुष्यबाण किंवा कमळ घेण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत यांनी लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी, सुहास माकडवाला, विनोद मटकर यांच्यासह ११३ गुंडांचा खात्मा केला आहे. अंधेरी किंवा नालासोपार्‍यातून त्यांनी तिकीट मिळाली यासाठी भाजपसह शिवसेनेचे दार ठोठावल्याचे समजते. यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे. आता प्रदीप शर्मा त्याच मार्गाने निघाले आहेत.
शर्मा यांचा गेल्या ३६ वर्षांपैकी सर्वाधिक काळ हा मुंबई पोलीस दलातील स्पेशल स्कॉडमध्ये गेला आहे. दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत. येत्या डिसेंबर अखेरीस निवृत्त होणार्‍या शर्मा यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपसह सेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शाश्वती असल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगरला’ सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -