घरमुंबईप्रदीप शर्मांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, स्वेच्छानिवृत्ती मंजूर

प्रदीप शर्मांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, स्वेच्छानिवृत्ती मंजूर

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा स्वेच्छासेवा निवृत्तीचा अर्ज २१ ऑगस्ट २०१९ पासून मंजूर करण्यात आला आहे. शर्मा यांनी ८ जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचा आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज २१ ऑगस्ट २०१९ पासून मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातला शासन आदेश गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीनिशी राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलीस सेवेतून कागदोपत्री निवृत्त होईपर्यंत त्यांना निवडणूक अर्ज भरता येणार नव्हता. प्रदीप शर्मा यांनी ८ जुलै रोजी पोलीससवेचा राजीनामा दिला होता. शर्मा यांचा राजीनामा बरोबर ४५ दिवसांनी मंजूर करत गृह विभागाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पोलीस सेवेतून मुक्त केले आहे.

pradeep sharma vrs application

- Advertisement -

हेही वाचा – प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून


शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तिकीट मिळण्याआधीच प्रदीप शर्मा यांनी वैयक्ति पातळीवर प्रचार सुरू केल्याचं देखील स्पष्ट झालं होतं. मात्र, कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिल्याची अधिकृत घोषणा मात्र केली नव्हती. त्यांची स्वेच्छानिवृत्तीची मंजुरी हा त्यामधला अडसर होता. मात्र, आता तो अडसर गृह खात्याकडून दूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा छत्रीवर प्रचार!

निवृत्तीवेतनाचे लाभ नाहीत

दरम्यान, प्रदीप शर्मा जरी स्वेच्छासेवानिवृत्त झाले असले, तरी त्यांना लगेच निवृत्तीवेतनाचे लाभ मिळणार नाहीत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या एनकाऊंटर प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना हे लाभ मिळणार नसल्याचं सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा – नालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीप शर्मांनी नेमला ‘चाणक्य’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -