घरमुंबईठाण्यात काँग्रेसकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे मैदानात?

ठाण्यात काँग्रेसकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे मैदानात?

Subscribe

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाण्याच्या मैदानात आंग्रे उतरण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मागील निवडणूकीत सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला होता. यंदा युती होणार की नाही यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाण्याच्या मैदानात आंग्रे उतरण्याची शक्यता आहे.

रवींद्र आंग्रेंची निवडणुकीसाठी जोरदार तयारी

रवींद्र आंग्रे यांनी सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमधील कार्यपद्धती त्यांच्या पचनी पडली नाही त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांना काँग्रेसन कोणतंही पद दिलेलं नाही. ठाणे विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी आंग्रे यांनी जनसंपर्क कार्यालय सूरु करून कामाला जोरदार सुरुवात केली आहे.

- Advertisement -

रवींद्र आंग्रेंची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून कामगिरी

मुंबई ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंड टोळ्या विरोधात आंग्रे यांनी मोहीम उघडली होती. कुख्यात गुंड सुरेश मचेकर या टोळीचा खात्मा आंग्रे यांनीच केला. मुंबई क्राईम ब्रँच मध्ये कार्यरत असताना ३१ खतरनाक गुंडांना यमसदनी पाठवून मुंबईचे गॅंगवार संपवले. ठाण्यात २२ गुंडांचा खात्मा करून जिल्ह्यातील गँगवर समूळ नष्ट केले. तब्बल ५३ गुडांचे एनकाऊंटर त्यांच्या नावावर आहेत. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम करून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत कार्यरत असताना त्यांनी १० एके 56 रायफली, ३३०० रायफलीच्या गोळ्या, १०० हँडग्रेडेड १५ रायफलीच्या मॅगझीन असा शस्त्रसाठा पकडून देशातील पोलीस खात्याचा हा विक्रम ठरला होता.

आंग्रे यांच्या राजकीय एन्ट्रीने राजकीय वर्तुळात खळबळ

ठाणे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र आंग्रे यांनीच सर्वात जास्त नावलौकिक कमावला आहे. त्यामुळे आंग्रे यांच्या राजकीय एन्ट्रीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ल्या म्हणून ओळखला जायचा. मात्र मागील निवडणुकीत भाजपने बालेकिल्ल्याला खिंडार पाडून भाजपचे संजय केळकर हे विजयी झाले. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे हा गड पुन्हा मिळवण्यासाठी सेनेची व्युह रचना आखली आहे. पण युती होणार की नाही यावर अनेक निर्णय ठरणार आहेत. मात्र काँग्रेसकडून आंग्रे यांनी तयारीला सुरुवात केली आहे.

भाजपची कार्यपद्धती पसंत पडली नाही त्यामुळे काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कामाला लागा, असा शब्द दिला आहे. त्यानुसार काम करत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– रवींद्र आंग्रे
- Advertisement -

हेही वाचा – एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा छत्रीवर प्रचार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -