घरमुंबईEngineers Day: मुंबई महापालिकेत २४३ कनिष्ठ अभियंत्यांची भरती

Engineers Day: मुंबई महापालिकेत २४३ कनिष्ठ अभियंत्यांची भरती

Subscribe

मुंबई महापालिकेत २४३ कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. सिव्हील, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रीक या संवर्गात रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये सर्वसाधारण गटांमध्ये १५७ जागा, तर महिलांसाठी ७५, खेळाडुंसाठी १०, अनाथ मुले १ आणि दिव्यांगासाठी १० अशा पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आज भारतीय अभियंता दिन (Engineer’s Day) आहे आणि आजच अभियंत्यांची भरती जाहीर होण्याचा योगायोग घडला आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील सिव्हील, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रीक या संवर्गातील कनिष्ठ अभियंता पदाची रिक्तपदे आता निवडपध्दतीने भरली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २४३ जागांसाठी ही परिक्षा घेण्यात येणार आहे. या कनिष्ठ अभियंता पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता वयाची अट ३८ एवढी आहे तर मागासवर्गीय उमकदेवाराकरता वयाची अट ४३ एवढी आहे. मराठी विषय घेवून उत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराला या परिक्षेत भाग घेता येणार आहे.

- Advertisement -

या पदासाठी खुल्या वर्गातील उमेदवाराला एस.एस.सी व पदविका अभ्यासक्रमांत ५० टक्के गूण तर सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी एस.एस.सी व पदविका अभ्यासक्रमांत ४५ टक्के एवढ्या गुणांची आश्यकता आहे. याबाबत http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जहिरात प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये सर्वप्रकारचे अटी व शर्तीसह अर्ज कशाप्रकारे भरायची याची माहिती देण्यात आली आहे. परिक्षेची तारीख या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल,असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -