घरमुंबईकोकणचो हापूस इलो रे

कोकणचो हापूस इलो रे

Subscribe

एपीएमसीतील फळविक्रेत्यांमध्ये उत्साह

दक्षिण आफ्रिकेचा हापूस आंबा एपीएमसी फळ मार्केट मध्ये येऊन गेल्यानंतर आता देवगडच्या हापूस आंब्याची एपीएमसी फळ मार्केट मध्ये इंट्री झाली आहे.50 ते 100 पेट्या सध्या मार्केट मध्ये दाखल होत असून 2 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत आंबा विकला जात आहे. मार्च च्या पहिल्या सप्ताहात हापूस मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यावरच दर कमी होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. अक्षय तृतीयापर्यंत वाट न पाहणार्‍या कोकणच्या हापूस आंबा बागायतदारांनी काही प्रमाणात मुंबई व पुणे येथील घाऊक बाजारात हापूस आंबा पाठविण्यास सुरुवात केली असून दररोज सरासरी पाच ते दहा हापूस पेट्या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. त्यांचा दरही तेवढाच असून पाच डझनाची एक पेटी दोन ते सात हजार रुपयांच्या घरात विकली जात आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या दक्षिण अफ्रिकेतील हापूस आंब्यामुळे खवय्यांच्या जिभेवर हापूस आंब्याची चव कायम आहे. कोकणात मोहर चांगला बहरला असल्याने यंदाचा मोसमही बहरणार असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे. काही वर्षांपूर्वी हापूस आंब्याची नैसर्गिक वाढ पूर्ण होऊन तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर झाडावरून तोडला जात होता. अलीकडे हापूस आंबा व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू झाली असून कल्टरचा प्रयोग करून हापूस आंब्याची लवकर कृत्रिम वाढ केली जाते. दिवाळीतच या प्रयोगातील पहिले हापूस आंबे मुंबई व पुण्याच्या घाऊक बाजारात पाठवून हापूस आंब्याच्या आगमनाची वर्दी दिली जाते, मात्र त्यानंतर ही आवक गायब होत असल्याचे दिसून येते. नवीन वर्षांच्या सुरुवातीसही आवक खर्‍या अर्थाने सुरू झाली असून दररोज पाच ते दहा हापूस आंब्याच्या पेटया बाजारात येत आहेत. साडेचार ते सहा डझनाच्या या पेटया साडेचार ते सात हजार रुपये किमतीला विकल्या जात आहेत. कोकणात थंडीचा कडाका सुरू असून हापूस आंब्याची फळधारणा पुरेशी धरलेली नाही. ऑक्टोबर हिटमुळे तयार झालेला हापूस आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या माध्यान्हापासून ही आवक जोरात सुरू होणार आहे.

- Advertisement -

कोकणातल्या हापूस आंब्यासारखा दिसणारा आफ्रिकन आंबा मार्केट मध्ये येताच हातोहात विकला गेला. त्या नंतर त्या आंब्याची मागणी वाढली असता त्याची आवक वाढली नाही. त्याच दरम्यान कोकणातील देवगडचा हापूस आंबा येण्यास सुरवात झाली आहे. त्याची आवक सुरू झाल्याने व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या पाच ते सहा डझन हापूस आंबे बाजारात येत आहेत. त्यांची आवक फेब्रुवारी मार्चनंतर वाढणार आहे. यंदाचा मोसम व्यापार्‍यांसाठी आशादायक आहे.
संजय पानसरे, माजी संचालक, घाऊक फळ बाजार, एपीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -