घरमुंबईनजर हटली अन् एस्कलेटरमध्ये तीन बोटं अडकली, चिमुरड्याने गमावली तीन बोट

नजर हटली अन् एस्कलेटरमध्ये तीन बोटं अडकली, चिमुरड्याने गमावली तीन बोट

Subscribe

मुलुंडमधील आर मॉलमध्ये एक्सलेटरमध्ये अडकून एका दीड वर्षाच्या मुलाला आपली तीन बोटं गमावावी लागली आहेत.

आपण खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जातो अशावेळी लहाण बाळ असेल तर ते ईकडे तिकडे धावत असत. त्यांच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर मोठी दुर्धटना होऊ शकते, हे एका घटनेवरून समोर आले आहे. आपल्याला जिने चढण्याचा कटांळा येतो तेव्हा सरकते जिने हे फारच आरामदायी वाटतात. मात्र, हेच कधीकधी जीवघेणे देखील ठरू शकतात. मुलुंडमधील आर मॉलमध्ये एस्कलेटरमध्ये अडकून एका दीड वर्षाच्या मुलाला आपली तीन बोटं गमावावी लागली आहेत.

आई वडिलांच लक्ष गेलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता

दीड वर्षीय चिन्मय आपल्या आई वडीलांसह  मुलुंड आर मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर तिघेही पहिल्या माळ्यावरून सरकत्या जिन्याच्या साहाय्याने खाली उतरले. परंतु त्यानंर चिन्मय आईवडिलांची नजर चुकवून एस्केलेटरकडे गेला. एस्केलेटर चढत असताना तो पडला आणि क्षणातच त्याचा हात जिन्याच्या पॅसेजमध्ये त्याची तीन बोटे अडकली. त्यावेळी चिन्मय जोरात ओरडला असता त्याच्या आई वडिलांच लक्ष गेले मात्र ते पोहचेपर्यंत खूप उशीर झाला होता. चिन्मयची तीनही बोटं एस्केलेटरमध्ये अडकून हातावेगळी झाली होती. यानंतर तातडीने पालकांनी चिन्मयला फोर्टिस रूग्णालयात दाखल केले. चिन्मयच्या हाताला तब्बल २५ टाके पडले आहेत. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला केईएम रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र तरीही चिन्मयच्या हातांच्या नसा दबल्या गेल्यामुळे तिनही बोटे डॉक्टरांना जोडता आली नाहीत.

- Advertisement -

सेन्सर्स असता तर अपघात टळला असता…

दरम्यान यासंदर्भात अद्यापपर्यंत मुलुंड पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे हे सरकते जिने किती जीवघेणे ठरू शकतात आणि पालकांनी अशा ठिकाणी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं किती गरजेचा आहे हे स्पष्ट होत आहे. बहुतेक सरकत्या जिन्यांना सेन्सर्स असतात. या सेन्सर्समुळे एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. मात्र त्याठिकाणी सरकत्या जिन्यांना सेन्सर्सची सुविधा नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -