वाघाचा व्हायरल निबंध तुम्ही वाचलात का? म्हणे ‘वाघ पट्टा घालत नाही’!

माझा आवडता प्राणी वाघ या विषयी लिहिलेला भन्नाट निबंध वाचून तुम्हाला ही हसू आवरणार नाही.

Mumbai
Essay on tiger viral
वाघावरचा निबंध व्हायरल

तुमचा आवडता प्राणी कोण? या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही भरभरुन लिहिलं असेल. त्यात आपण अनेक प्राण्यांचा उल्लेख करतो. कोणाला कुत्रा, कुणाला ससा, कुणाला हत्ती, कुणाला मांजर आणि कुणाला घोडा आवडतो असे अनेक प्राणी आपल्याला आवडतात. त्यावर निबंध लिहिताना जास्त विचार करावा लागत नाही. पण, सोशल मीडियावर वाघावरचा एक भन्नाट निबंध व्हायरल झाला आहे. ज्यात या निबंध लिहिणाऱ्याने वाघ पट्टा घालत नाही असं चक्क लिहिण्यात आलं आहे.

तर तो का पट्टा घालत नाही त्याचं ही स्पष्टीकरण या निबंधात देण्यात आलं आहे. या पट्ट्याने लिहिलेला निबंध सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर अनेक कॉमेंट्स देखील येत आहेत. ज्याने हा निबंध लिहिलाय त्याला किमान १२ तोफांची सलामी द्या अशा अनेक कॉमेंट्स या निबंधावर येत आहेत ज्या वाचून तुम्ही हसल्याशिवाय राहू शकणार नाही.

‘म्हणे वाघ पट्टा घालत नाही’

माझा आवडता प्राणी वाघ असं म्हणत वाघाचे शरीर पट्टेरी असते. वाघाच्या शरीरावर जरी पट्टे असले तरी तो पट्टा घालत नाही. कारण वाघ हा एक प्राणी असून आणि म्हणून तो पँट घालत नाही. फक्त माणूस पँट घालतो. हा निबंध नेमका कोणी लिहिलाय हे अजून समोर आलेलं नाही. पण, ज्याने कोणी हा निबंध लिहिलाय त्याने अतिशय मनापासून हा निबंध लिहित वाघावरचं आपलं प्रेम सिद्ध केलंय.

Essay on Tiger viral
वाघावरचा निबंध व्हायरल