घरताज्या घडामोडीमाणगावमध्ये एमआयडीसीची स्थापना; एक लाख कोटीची गुंतवणूक होणार

माणगावमध्ये एमआयडीसीची स्थापना; एक लाख कोटीची गुंतवणूक होणार

Subscribe

मध्यम उद्योगांचे जाळे विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल.

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ६ हजार हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. माणगाव औद्योगिक वसाहतीत परदेशी आणि देशातंर्गत गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास फार मोठ्या संख्येने लघु तसेच मध्यम उद्योगांचे जाळे विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल. शिवाय  कोकणातील तरुणांना हजारोंच्या संख्येने नोकऱ्या उपलब्ध होऊन अप्रत्यक्ष रोजगारास चालना मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२ हजार १४० हेक्टर क्षेत्र सन २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३ हजार २७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली तसेच वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आली आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, रायगड जिल्ह्यात थेट परकिय गुंतवणुकीतून आणि देशांतर्गंत उद्योग समुहांकडून विशाल प्रकल्प उभारण्यासाठी भूखंडांची मागणी होत आहे. माणगाव तालुक्यात ३ हजार २७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या तसेच खासगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी आणि कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखविल्याचे, असेही देसाई म्हणाले.

* कोकणात नवी एमआयडीसी

- Advertisement -

* माणगावमधील ३ हजार २७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीकडे

* गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित

* गुंतवणुकदारांची मागणी आणि कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन एमआयडीसीचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -