घरमुंबईदेशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलेसीस रुग्णांची नोंद

देशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलेसीस रुग्णांची नोंद

Subscribe

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. अनियंत्रीत मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे किडनी फेल्युअरसाठी जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे तरुण पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे. देशात प्रत्येक वर्षी दोन लाख डायलेसीसचे रूग्ण वाढत आहेत. त्यामानाने डायलेसीस मशीनची कमतरता भासत आहे. अशी माहिती नेफरोलॉजिस्ट डॉ. दिनेश महाजन यांनी डोंबिवलीत केले. जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने डॉ. महाजन यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किडनीसंदर्भातील आजाराची लक्षणे, उपाय आणि घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती दिली.

गेल्या दहा वर्षात देशात किडनीच्या आजारासंदर्भातील रूग्ण वाढले आहेत. शंभर रूग्णांमागे 17 रूग्ण हे किडनीच्या आजाराचे प्रमाण आहे. दरवर्षी 2 लाख रूग्णांना डायलेसीस करण्यासंदर्भात डॉक्टरकडून सूचना केली जाते. मात्र त्यातील 10 टक्के रूग्ण डायलेसीस करतात. उर्वरित लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. तसेच ग्रामीण भागात डायलेसीसची सुविधाही नाही. शहरात अनेक रूग्णालयात डायलेसीस सेंटर उभारण्यात येत आहेत मात्र ती कमी पडत आहेत. डायलेसीस ही खर्चिक बाब ही आहे. 50 टक्के मधुमेह आणि 20 टक्के रक्तदाब अशा 70 टक्के प्रमाण हे किडनी फेल्यूअरसाठी जबाबदार असतात. उर्वरित 30 टक्के प्रमाण हे इतर अनेक कारणांमुळे होतात. डायलेसीसच्या वाढत्या संख्येनुसार यंत्रणा कमी पडत आहे हे जरीखरं असलं तरी सरकारवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहता कामा नये. एकदा डायलेसीस सुरू झाले कि शेवटपर्यंत असते. त्यामुळे आपणच आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे असेही महाजन म्हणाले. किडनी स्टोनचे प्रमाणही वाढत आहे, त्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि मीठ कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. 30 ते 35 वयोगटातील तरूणांना या आजाराने पछाडले आहे. त्यामुळे तरूणांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -