घरमुंबईप्रत्येकाला 'जागा' दाखवली; सुप्रीम कोर्टानंतर राज ठाकरेंनेही सरकारला फटाकरले

प्रत्येकाला ‘जागा’ दाखवली; सुप्रीम कोर्टानंतर राज ठाकरेंनेही सरकारला फटाकरले

Subscribe

सीबीआय संचालक पदाचा वादात सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला चांगलाच झटका दिला. संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. आज सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी झाली असताना आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे संविधानाच्या विरोधात असल्याची गंभीर विधान कोर्टाने केले आहे. केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने सकाळी फटकारल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विषयावर व्यंगचित्र काढून सरकारला पुन्हा फटकारले आहे.

#CBIvsCBI #AlokVerma #NarendraModi #SupremeCourt #RajThackeray #PoliticalCartoon

Posted by Raj Thackeray on Tuesday, 8 January 2019

- Advertisement -


व्यंगचित्र भाजपला झोंबण्याची शक्यता

राज ठाकरे यांनी चितारलेले व्यंगचित्र भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. कारण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोर्टाने पिंजऱ्यात उभे केले असून सरन्यायाधीश मोठ्या सन्मानाने आलोक वर्मा यांना “या वर्माजी बसा” असे म्हणत संचालक पदाच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करत आहेत. यानंतर नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव दाखवले असून आलोक वर्मा मात्र ठामपणे मोदी यांच्याकडे पाहत असल्याचे दिसते. ‘प्रत्येकाला जागा दाखवली’ असे शीर्षक दिल्यामुळे हे व्यंगचित्र आता भाजपला चांगलेच झोंबण्याची शक्यता आहे.

प्रकरण काय होते

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील अंतर्गत वाद टोकाला गेला होता. त्यात सरकारने बेकायदेशीर हस्तक्षेप करत आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर आलोक वर्मा यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि न्यायाधीश एस. के. कौल यांच्या खंडपीठाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत वर्मा यांना रजेवर पाठवण्याचे आदेश रद्द केले. वर्मा यापुढे संचालक पदावर कायम राहतील. मात्र त्यांना मोठे किंवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -