घरमुंबईमुंबईत १६ हजार मद्यसाठा जप्त; १२८ जणांना अटक; ५ वाहने जप्त

मुंबईत १६ हजार मद्यसाठा जप्त; १२८ जणांना अटक; ५ वाहने जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबईत करण्यात येणाऱ्या धडक कारवाईत १६ हजार लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला असून १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तर ५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने आणि नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे २ लाख ५५ हजार किंमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबईचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

९ हजार ९२४ लीटर मद्यसाठा जप्त

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्य साठ‌्यावर कारवाई करण्यात येते. सार्वत्रिक निवडणूक विषयक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत देखील या खात्याद्वारे वेळोवेळी धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार ११ मार्च ते ३१ मार्च या कालावधी दरम्यान विविध ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये इतक्या किमतीचा ९ हजार ९२४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या अनुषंगाने ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर १ लाख ९५ हजार एवढ्या अंदाजित किंमतीची ३ वाहने देखील जप्त करण्‍यात आली आहे.

- Advertisement -

६ हजार १४० लीटर मद्यसाठा जप्त

१ एप्रिल ते १५ एप्रिल २०१९ या कालावधी दरम्यान विविध ४९ प्रकरणी सुमारे ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये इतक्या किंमतीचा ६ हजार १४० लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे ६० हजार किंमतीची २ वाहने देखील जप्त करण्‍यात आली आहेत. तर ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधी दरम्यान विविध १४२ प्रकरणी सुमारे १८ लाख ३ हजार ५४४ रुपये इतक्या किमतीचा सुमारे १६ हजार ६४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६१७ लीटर हातभट्टीची दारु, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘वॉश’ रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लीटर बीअर, ताडी १ हजार १९४ लीटर आणि इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे २ लाख ५५ हजार किंमतीची ५ वाहने देखील जप्त करण्‍यात आली आहेत.


वाचा – उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत दीड लाखांचा मद्यसाठा जप्त

- Advertisement -

वाचा – माहिमच्या नाकाबंदीत तीन कोटीचे विदेशी चलन जप्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -