घरमुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब; ही घ्या नाणारची जमीन खरेदी करणार्‍यांची नावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब; ही घ्या नाणारची जमीन खरेदी करणार्‍यांची नावे

Subscribe

विशेष म्हणजे १९० जणांपैकी बहुतांश लोकांनी नाणार परिसरातील १४ गावांमधील जमिनी घेतल्या आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याच्या दोन वर्षे आधीच संबंधित खरेदीदारांना माहिती असल्याने इतर राज्यांतून सुमारे २५०० एकर जमिनीची खरेदी करण्यात आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ही घ्या नाणार रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्यापूर्वी २०१६ मध्ये जमीन खरेदी करणार्‍यांची दुसरी नवीन यादी. याआधी शहा, मोदी, जैन, सिंघवी अशी जमीन खरेदीदारांची २९ जणांची एक यादी जाहीर झाली होती. आता प्राची त्रिपाठीसह १९० जणांच्या दुसर्‍या यादीतही गुजरात, मध्य प्रदेेश, राजस्थानसह इतर राज्यांतूनच जमीन खरेदी झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे १९० जणांपैकी बहुतांश लोकांनी नाणार परिसरातील १४ गावांमधील जमिनी घेतल्या आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याच्या दोन वर्षे आधीच संबंधित खरेदीदारांना माहिती असल्याने इतर राज्यांतून सुमारे २५०० एकर जमिनीची खरेदी करण्यात आली. खरेदीदारांनी स्थानिकांकडून एकरी २ लाख रुपयांनी जमीन खरेदी केली आणि हेच शहा, मोदी, त्रिपाठी, मेहता रिफायनरीसाठी संमतीपत्र देत एकरी ३५ लाखांची मागणी राज्य सरकारकडे करत आहेत. त्यामुळे संमती देणारे सारे परराज्यातील कोकणी बांधव आहेत.

- Advertisement -

नाणारसाठी 2५00 एकरची संमती पत्र देणार्‍या कोकणी बांधवांची दुसर्‍या यादीतील नावे

रिझवान मन्सूर काझी,कनक रतनलाल दुग्गार,अमित परमानंद शुक्ला,सुशिलकुमार अच्चा,सुभाष केडिया,चंद्रकांत भन्साली,चंपकलाल मांगेलाल शहा,शांतीलाल मांगीलाल शहा,शशिकांत मांगीलाल शहा,निशांत नरेंद्र भगत,आदित्य अनिल गग्गर,धीरजकुमार खंडेलवाल,बिना इंद्रकुमार (सर्व जमीन खरेदीदार चौके गाव)

सुनंदा दिनेश शहा,आशिष रामचंद्र मेहता,रमेशचंद्र चिमणलाल मेहता,चंद्रकांत भन्साली,किरिट मनीलाल मेहता,सुजिता सुरेश शहा,महिंद्र मांगीलाल शहा, शांतीलाल मांगीलाल शहा (सर्व खरेदीदार कारशिंगे गाव)

- Advertisement -

दिनेश ओमप्रकाश पारिख,राजेंद्र शिवालाल डागा,प्राची त्रिपाठी,सुनिल जसराज चोरडिया,मोहनलाल चंदनलाल राठोड,सतिश किसन केडिया,सुभाष किसन केडिया,महेशकुमार मुंदिराज, परमानंद शुक्ला,दीपक कांतिलाल शहा,प्रफुल्ल बाबुलाल शहा,दिनेश वाडिलाल चौधरी,हरिलाल वाडिलाल चौधरी,विवेक अनराज शहा,सिद्धी रूषभ शहा,कनुभाई हिरालाल शहा,अजय मनिलाल शहा,नितिन मनुभाई शहा (सर्व जमीन खरेदीदार उपके गाव)

राजेंद्र डागा,संजय बिहाणी,राधेश्याम फालोड,प्रकाश मदलेचा,गणेश भुतडा,सौरभ सुरेंद्रकुमार जैन (सर्व जमीन खरेदीदार काळादेवी गाव)

रवी दत्ता बोंढारे -हिंगोली,संजय माळी- मानगाव,राजेंद्र शिवलाल डागा,संजीव गोम्स (सर्व जमीन खरेदीदार साखर गाव)

प्राची त्रिपाठी,सुकेश सुरेश मुंदडा,रूचा प्रमोटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स,प्रशांत छाचड,महेंद्र कांचनलाल शहा,शेरिल नलिन मोरखिया
(सर्व जमीन खरेदीदार विन्ये गाव)

मुदलीयार येल्लुस्वामी (जमीन खरेदीदार सांगवे) संंजिवनी उगले -नगर (जमीन खरेदीदार कारिवणे ),सुनिल जसराज चोरडिया,सपना सुभाष केडिया (सर्व जमीन खरेदीदार पडवे गाव)

महेश कांतिलाल शहा,पिनेश अतराज शहा,शांताबेन अतराज शहा,कनुबाई हिरालाल शहा,राकेश ललितकुमार शहा,कमलेश चंदुलाल मेहता,नितिन मनुभाई शहा,केयुर दिलीप गांधी, चंद्रकांत भन्साली,कमलेश जेठलाल शहा,मांगिलाल हस्तिलाल जैन,महेंद्र मांगिलाल शहा,दर्शना राहुल गोलेचा,मनीष रामनिरंजन झुनझुनवाला (सर्व खरेदीदार गोठिवरे-उपळे गाव)

कनक रतनलाल डुग्गर, अनिताबेन जितेंद्र शहा,सिद्धी रूषभ शहा,शिवकुमार शहा,गोरखनाथ मढवी,निलेश नविनचंद्र शहा,शैलेश रतिलाल झवेरी,इंदु विमल सोलंकी,विपिनकुमार जिपनलाल बापना,संगिता राकेश संघवी,निलेश नविनचंद्र शहा,दिनेश धरमशीश शहा,रमेश धनराज जैन,समीर रेवती झा,पुखराज बोथमाल सिंंघवी,दीपक जयप्रकाश झवेरी,राहुल जगन्नाथ हेगडे,राहुल भिवड,विनोद विठ्ठलराव भातलवंडे- बीड, गौरव विनयकुमार जैन- जोधपूर, शैलेंद्र रमेशचंद्र राठी-पुणे,पद्मजा मंत्री-पुणे,महेशकुमार मुंदीराज,शरद धीरालाल शहा,पुनित दौलत अदनानी,भरतकुमार बाबूलाल पारेख, प्रकाश राठी, शकुंतला नरेंद्र लखोटिया,चंद्रकांत, भन्साली,राजेन किर्तीलाल शहा,अविष्कार मुरलीमनोहर अग्रवाल,प्रणव विनोद जोशी,अर्पिता पथिक शहा,विशाल यवनमल शहा,कुणाल यवनमल शहा
(सर्व जमीन खरेदीदार तारळ गाव)

माहितीस्त्र्रोत : सत्यजित चव्हाण

व्हॉटसअ‍ॅपवरुन फिरणारी पहिली यादी

गौरव विनायकुमार जैन
दीपेन भरत मोदी
पुनीत सतीश वाधवा
सौरभ सुरेंद्रकुमार जैन
प्राची त्रिपाठी
पुखराज बोथमल सिंघवी
हिमांशू प्रशांत नीलावार
दिनेश धर्मशी शहा
किशोर रातीलाल शहा
मित्तव वर्दीभाई दोषी
कनक रतनलाल दुग्गर
राजेश सुंदतलाल शाह
संतोष रातनलाल कटारिया
अनिताबेन जितेंद्र शाह
सिद्धी रिषभ शाह
सतीश किशन केडिया
सपना सुभाष केडिया
गौतम जेथमल जैन
सुभाष किसन केडिया
महेश कांतीलाल शाह
विलास रतनलाल कटारिया
गानेढं भिवराज भुतडा
नंदकिशोर कन्हैयालाल चांडक
अमित घनश्याम ठावरी
उमाकांत मनोहरलाल राठी
अस्मिता दिनेश मांगूकिया
मनीष रामरंजन झुनझुनवाला
संजय भिकुलाल दुधावत
प्राची अमित शाह
महेंद्र मांगीलाल शाह

नाणार थोडक्यात

  • प्रकल्प रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर
  • अडीच लाख कोटींची गुंतवणूक
  • १ लाख लोकांना रोजगार मिळणार
  • १५ हजार एकर जमीन संपादित करणार
  • ३ हजार २०० कुटुंब विस्थापित होणार
  • ८ हजार शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार
  • संपादित जमिनीवर आंबे आणि काजू
  • मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
  • प्रदूषणामुळे कोकणचे सौंदर्य नष्ट होईल
  • आशियातील सर्वात मोठी रिफायनरी
  • बीपीसीएल आणि एचपीसीएलचा प्रकल्प

विरोध कशासाठी?

या भल्यामोठ्या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुमारे आठ हजार शेतकर्‍यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या महाकायतेमुळे तीन हजारहून अधिक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती आहे. या सर्व कारणांमुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. संपादित जमिनीवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा असून, येथील आंब्याला जगभरातून मागणी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर उभारण्यात येत असल्याने हजारो मच्छीमार्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचीही भीती आहे. मोठ्या प्रमाणावर होणार्‍या प्रदूषणामुळे कोकणचे सौंदर्य नष्ट होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात उभारण्यात येणार्‍या नाणार तेल प्रकल्पाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. या माध्यमातून सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारण्याचा चंग सरकारने बांधला आहे. मात्र, सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेने आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेलेल्या नारायण राणे यांनी प्रकल्पाला विरोध केल्याने सरकारची कोंडी झाली आहे.

नाणारवरून पावसाळी अधिवेशनात काय घडले…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा नाणार प्रकल्पावरून गाजले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नाणारवासीयांनी नागपुरात आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. विरोधकांनीही हा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तीन दिवस कामकाज ठप्पही झाले होते. या मुद्यावर विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करीत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिले.


हेही वाचा

नाणारची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल विधानपरिषदेत गाजली


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

नाणार प्रकल्पाला विरोध करणारे काही स्थानिक नागरिक आहेत आणि काही बाहेरचेही आहेत. ज्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही समावेश आहे. तसेच यामध्ये काही मासेमारी करणारेही आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने प्रकल्पासंदर्भातील अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला. हा केवळ त्यांच्या विभागाचा निर्णय आहे, सरकारचा नाही. राज्य सरकारने अद्याप अधिसूचना रद्द केलेली नाही.

राज्य सरकारने जमीनधारकांना नोटिसा बजावल्यावर पाच ते साडेपाच हजार जणांनी त्यावर आक्षेप घेतला. पण त्याचवेळी अडीच हजार एकर जमीन देण्यासंदर्भात लोकांनी पत्रही दिले आहेत. त्यामुळे नाणारमध्ये फक्त विरोध होतोय, अशी स्थिती नाही. प्रकल्पासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

गुजरातमधील जामनगरमध्ये सुद्धा रिफायनरी प्रकल्प आहे. तरीही तेथून सर्वाधिक आंबा निर्यात होतो. तिथे मासेमारीही मोठ्या प्रमाणात होते आहे. असे असले तरी कोणत्याही स्थितीत नाणार प्रकल्प स्थानिकांवर लादायचा नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. स्थानिकांच्या आणि विरोधकांच्या गैरसमजुती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टीने लोकांशी, विविध संघटनांशी आमची चर्चा सुरू आहे.

नाणार प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्याचे काम सरकारने निरी, आयआयटी पवई आणि गोखले इन्स्टिट्यूट यांच्याकडे दिले आहे. या संस्थांकडून आलेला अहवाल आणि लोकांची मते आम्ही जाणून घेत आहोत. जोपर्यंत ही चर्चा सुरू आहे, तोपर्यंत या प्रकल्पासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय आम्ही घेणार नाही. हा प्रश्न आम्हाला चर्चेतून सोडवायचा आहे. लादायचा नाही.

आमदार भाई जगताप काय म्हणाले…

नाणार प्रकल्पावरून आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुख्यमंत्री अडखळत होते.
या प्रकल्पासाठी अडीच हजार एकर जागा देण्यास तयार झालेल्या लोकांची नावे सभागृहाला सांगावीत, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारले. कोकणात प्रत्येकाच्या ताब्यात असलेली जमीनधारकता कमी असते. त्यामुळे ज्यांनी जागा देण्यास संमती दर्शवली आहे तो आकडा हजारोंमध्ये असणार. जागा देण्यास संमती दर्शवलेल्यांच्या जीविताला धोका असल्यामुळे त्यांची नावे जाहीर करू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. नाणार प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार असणार्‍यांना राज्याचे प्रमुख संरक्षण देऊ शकत नसतील आणि त्यांची नावे सांगू शकत नसतील, तर नक्कीच या प्रकल्पामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा आमचा अंदाज स्पष्ट होतो. शिवसेना सुद्धा या संदर्भात दुटप्पी भूमिका घेते आहे. इथे भाषणे वेगळी करतात आणि तिथे लोकांपुढे जाऊन वेगळे सांगतात. एकूणच नाणारच्या बाबतीत सत्य स्थिती काहीतरी वेगळीच असल्याचा आमचा दाट संशय आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -