बांगलादेशी महिलांचे शोषण

लॉजमालकाला अटक

Mumbai
अटक

घुसखोर बांगलादेशी महिलांना लॉजवर डांबून ठेवून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्री व्यवसाय करून घेणार्‍या लॉजमालकाला मध्यवर्ती पोलिसांनी तब्बल 8 महिन्यांनी शोधून त्याला झडप घालून ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मध्यवर्ती पोलिसांनी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कॅम्प ३ येथील शांतीनगर परिसरात असणार्‍या नित्या रेसिडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींगमध्ये छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये मॅनेजर, वेटर व लॉजमालक रत्नाकर शेट्टी यांनी 3 पीडित घुसखोर बांगलादेशी महिलांना लॉजमध्ये डांबून ठेवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना पैशाचे अमिष दाखवून लॉजमध्ये येणार्‍या ग्राहकांसोबत आर्थिक फायद्याकरता त्या महिलांकडून देहविक्री व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 3 बांगलादेशी महिलांसह लॉज मॅनेजर सोमनाथ व वेटर शिवदयाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली होती, पण त्या गुन्ह्यातील लॉजमालक रत्नाकर शेट्टी गेल्या 8 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता. शुक्रवारी दुपारी रत्नाकर हा नित्या लॉजमध्ये आला असल्याची माहिती पोलीस हवालदार विजय बनसोडे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बनसोडे, पोलीस नाईक मोरे, पारधी यांनी नित्या लॉजमध्ये जाऊन रत्नाकर शेट्टी याला ताब्यात घेऊन अटक केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here