घरमुंबईमाटुंगा वर्कशॉपला बक्षीस मिळवून देणार्‍या कर्मचार्‍यांची हकालपट्टी

माटुंगा वर्कशॉपला बक्षीस मिळवून देणार्‍या कर्मचार्‍यांची हकालपट्टी

Subscribe

ज्या कर्मचार्‍यांच्या परिश्रमावर रेल्वेच्या माटुंगा कारखान्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यातील 70 कामगारांना तडकाफडकी कमी करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नियुक्तीबाबत रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार कर्मचारी अपात्र ठरत असल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येत असले तरी त्यांना रेल्वेत कायमस्वरुपी भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने केला आहे. हा प्रकार थांबला नाही तर रेल्वे विरोधात जनआंदोलन पुकारले जाईल. अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मशिनी आहेत. रेल्वेचे इंजिन,गाड्यांच्या डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांबरोबरच या ठिकाणी रेल्वे कोचेस तयार केले जातात. मध्य रेल्वेच्या महत्त्वपूर्ण वर्कशॉपपैकी हे एक आहे. या वर्कशॉपचे अधिकाधिक काम खासगी कंत्राटदारांना दिले आहे. ज्यामध्ये स्वच्छतेपासून रेल्वे डब्याच्या दुरुस्तीच्या कामाचा समावेश आहे. हे काम करत असताना कामगार कायद्याला बगल देत खासगी कामगारांची पिळवणूक कंत्राटदारांकडून वर्कशॉपमध्ये होत आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये सफाई कर्मचार्‍यांचे कंत्राट नुकतेच संपले आहे.

- Advertisement -

त्यामुळे नवीन कंत्राट मिळाल्यानंतर जुन्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात येईल. असे आश्वासन कंत्राटदाराने कामगारांना दिले. नवीन अटी आणि शर्ती लादून वर्कशॉपमधून ७० कामगारांना कामवरून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. परिणामी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वर्कशॉप प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने कर्मचार्‍यांना काढण्यात आल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेकडून करण्यात आला आहे.

काय आहेत अटी आणि शर्ती?
पूर्वी रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये काम करण्यास कामगारांना कामावर रुजू होताना फक्त आठवी पास असल्याची अट होती. मात्र, आता या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्यात सफाई कर्मचार्‍यांसाठी १० वी पास आणि ४५ वयाची मर्यादा टाकली आहे. त्यामुळे आता कारखान्यात सफाई काम करणारे अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचार्‍यांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा बसत नसल्याने त्यांना कामावरून कमी केल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

वर्कशॉपमध्ये अनेक अपघात
माटुंगा वर्कशॉपमधील खासगी सफाई कर्मचार्‍यांना सफाईच्या कामासोबतच रेल्वेचे अन्य कामही करावे लागते. जड काम करण्याचा अनुभव सफाई कर्मचार्‍यांना नसल्याने अनेक वेळा अपघात होता. त्या अपघात अनेकांनी आपले हातपाय गमावले आहेत. खासगी कर्मचारी असल्यामुळे त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही. कंत्रादाराविरोधात बोलायची हिंमत दाखवल्यास त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. आता तर चक्क नवीन अटी आणि शर्ती लागू करून आम्हाला कामावरून काढण्याच्या डाव वर्कशॉपचे अधिकारी आणि कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. अशी माहिती माटुंगा वर्कशॉपमधील सफाई कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये खासगी 70 कर्मचार्‍यांना नवीन अटी आणि शर्ती लादून कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये खासगी कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन रेल्वेचे वर्कशॉपमधील अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात आवाज उचलला पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. –मित भटनागर, उपाध्यक्ष सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, मुंबई

कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय संबंधित कंत्राटदाराचा आहे. कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करणारे असल्याने हा प्रश्न संबंधित कंत्राटदाराचा आहे. त्याच्याशी रेल्वेचा काहीही संबंध नाही. – सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -