घरमुंबईफेसबुकच्या मैत्रीने घातला १७ लाखांचा गंडा

फेसबुकच्या मैत्रीने घातला १७ लाखांचा गंडा

Subscribe

५० वर्षीय महिलेला फेसबुकवरच्या मित्राने तब्बल १७ लाखांचा गंडा घातल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे.

फेसबुकवरच्या मित्राकडून बॅंकेत काम करणाऱ्या ५० वर्षीय महिलेला तब्बल १७ लाखांचा गंडा घातल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे.  फेसबुकवर मैत्री करुन अमेरीकेतल्या वॉशिंग्टन शहरात राहत असल्याचे सांगून मार्च आणि मे या तीन महिन्याच्या कालावधीत या महिलेला तब्बल १७ लाखांची लुट करण्यात आली आहे. याप्रकरणी अलीबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अलीबाग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार सदर घटनेतील आरोपीने पहिल्यांदा पीडित महिलेचा विश्वास संपादन करुन तिची फसवणूक करण्यात आली.

नक्की काय घडलं

दरम्यान, महिलेने केलेल्या दाव्याप्रमाणे तिला दिल्ली कस्टम ऑफिसमधून फोन आला आणि अमेरिकेमधून पार्सल आल्याचे सांगण्यात आले. हे पार्सल जर महिलेने स्वीकारण्यास नकार दिला तर तिला कस्टम पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असेही सांगण्यात आले. दरम्यान त्याच व्यक्तीने पुन्हा महिलेला फोन करुन हे पार्सल मी अलिबागला घेवून येणार असल्याचे सांगितले. ज्या पार्सलमध्ये महागडे गिफ्टस आणि परदेशी चलन असल्याचे सांगण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीकडून हे पार्सल (लॉकर) महिलेला देण्यात आले.

- Advertisement -

या लॉकरचा पासवर्ड नंतर सांगतो असे सांगून तो व्यक्ती निघून गेला. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी आलेल्या कॉलवरुन महिलेला असे सांगण्यात आले की, त्या लॉकरमध्ये परदेशी चलन असल्यामूळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आणि समोरच्या व्यक्तीने आसाम आणि कोलकाता या ठिकाणी असणाऱ्या ९ वेगवेगळ्या बॅंक खात्यांची माहिती दिली आणि महिलेला त्यामध्ये पैसे ट्रानस्फर करण्यास सांगितले. जवळपास १७ लाख रुपयांची रक्कम या महिलेने त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केलेली आहे. यासंदर्भात पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -