बलात्काराच्या भीतीनेच तिने मुलीला साखळदंडाने बांधले!

सायन कोळीवाड्यातील एका लहान मुलीला तिच्या आईने साखळदंडाने बांधले असल्याचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, तिने तसं का केलं याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे.

Mumbai
Minor Girl

गुरुवारी दुपारी एका महिलेने आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या महिलेवर नेटिझन्सने कॉमेंट्सही केल्या होत्या. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. मात्र, तिने मुलीला का बांधून ठेवलं होतं? याचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ‘आपल्या मुलीवर कुणी बलात्कार करू नये, म्हणून मी तिला साखळीने बांधून ठेवलं होतं’, अशी स्पष्टोक्ती या महिलेने दिली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच काय करावं? हे सुचेनासं झालं.

‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे प्रकार उघड

सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनी या ठिकाणी पंजाब राज्यातील एक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून फुटपाथवर वास्कव्य करत आहे. या कुटुंबात ६५ वर्षांची एक वृद्ध महिला, तिचा ४० वर्षांचा अपंग मुलगा, पतीने सोडून दिलेली २५ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांची नात असे सदस्य आहेत. अपंग मुलगा हा गुरुद्वारामध्ये सेवा करतो, तर मुलगी ही जवळच कटलरी सामानाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. गुरुवारी सकाळी सोशल मिडीयावर एका मुलीला साखळदंडात बांधण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची सत्यता पडताळली असता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

अत्याचाराच्या भीतीने मुलगी साखळदंडात

माहीम येथे दोन आठवड्यांपूर्वी फुटपाथवर राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या कऱण्यात आली होती. या घटनेमुळे फुटपाथवर राहणाऱ्या सर्वच कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून आपल्या मुलीवर हा प्रसंग ओढवू नये या भीतीने सायन कोळीवाडा येथे राहणाऱ्या या कुटुंबाने ७ वर्षांच्या मुलीचा एक पाय साखळदंडात अडकवून त्याला कुलूप लावले होते. या कुलुपाची चावी आजी आणि आईकडे असते. मुलीला थोडावेळ साखळदंडातून मोकळे करून तिला खेळण्यासाठी पाठवलं जातं. मात्र पुन्हा तिला साखळदंडात अडकवलं जातं.


वाचा सकाळी नेमकं काय घडलं – मस्ती करते म्हणून मुलीला साखळीने बांधले

गर्दुल्ल्यांची कायमच भीती

या बाबत या मुलीच्या आजीसोबत चर्चा केली असता तिने ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले की, ‘माहीम येथे एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचं आम्हाला काही दिवसांपूर्वीच कळलं होतं. आम्ही सुद्धा उघड्यावरच राहतो. माझ्या नातीच्या बाबतीत असा प्रसंग ओढवू नये म्हणून तिला आम्ही सतत आमच्या नजरेसमोर ठेवण्यासाठी तिचा एक पाय साखळदंडात अडकून ठेवतो’. मुलीला शाळेतही प्रवेश दिला होता. मात्र तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे तिला शाळेतून काढावे लागले. जवळच दोन उद्यानं असून या उदयानांत दारुडे, गर्दुल्ल्यांचा सतत राबता असतो. मुलीची आई कामावर गेल्यावर मी आणि नात एकटेच राहतो. वयोमानानुसार मला तिच्या मागे धावता येत नाही. त्यामुळे त्या दिवसापासून आम्ही घाबरून तिला आमच्या नजरेसमोरून कुठे जाऊ देत नाही’, असेही आजीने बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here