घरमुंबईशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रमाणिकरणास सुरुवात

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रमाणिकरणास सुरुवात

Subscribe

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या असे तर वाडा तालुक्याच्या हमरापूर या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी किसन लक्ष्मणराव चौधरी यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी सांगितले.

या योजनेचा शुभारंभ आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक रवींद्र भोसले, ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय पटेल, शाखा अधिकारी शेळके, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील असे व हमरापूर येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली आहे. या दोन गावातील थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. असे व हमरापूर येथील प्रत्येकी 149 व 111 अशा एकूण 260 पात्र शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकर्‍यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे. जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक हौसारे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -