घरमुंबईपश्चिम रेल्वे पूर्वपदावर

पश्चिम रेल्वे पूर्वपदावर

Subscribe

ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेवरील ट्रेनचा गोंधळ झाल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. पण आता गाड्या पूर्वपदावर आल्या आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. कोणतीही सूचना न देता फास्ट लोकल सांताक्रूझ स्थानकात अर्धा तास थांबून ठेवण्यात आली. त्यामुळे नेमके काय झालं प्रवाशांना काहीच कळत नव्हत. विरारहून सकाळी ७.०९ वाजता निघालेली फास्ट लोकल बोरीवलीला नियोजित वेळेनुसार आली. पण त्यानंतर ती थांबत थांबत सांताक्रुझपर्यंत आली. आणि सांताक्रुझ स्थानकात तब्बल ३० मिनिटे थांबली. याचा परीणाम स्लो आणि फास्ट ट्रॅकवर झाला. पण आता पश्चिम रेल्वे पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे.

तुम्हाला हे माहित आहे का? –

रेल्वेच्या एसी डब्यातून १४ कोटींचे टॉवेल्स,उशा, चादरींची चोरी!

 जम्मू-तावीमुळे खोळंबा

जम्मूवरुन येणाऱ्या जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाने चेन खेचल्यामुळे ही गाडी थांबण्यात आली होती. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील लोकल गाड्या थांबण्यात आल्या असल्याचे समजले आहे. ऐन गर्दीच्यावेळी लोकलचा खोळंबा झाल्याने बोरीवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी झाली. पण आता खोळंबलेली फास्ट लोकल सांताक्रुझ स्थानकातून निघाली असून स्लो गाड्याही पूर्वपदावर आल्या आहेत.

- Advertisement -
वाचा- नेरूळ – खारकोपर रेल्वेचा प्रवाशांना फायदा तर रहिवाशांना फटका

 

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -