घरमुंबईसर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅग

सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅग

Subscribe

एमएसआरडीसी आणि एनएचएआयमध्ये करार

मुंबईतील टोल नाक्यावर सध्याची ईटीसी टॅगची यंत्रणा आता कात टाकणार आहे. ईटीसी टॅगधारकांनाही आता फास्ट टॅगचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे मुंबई शहराअंतर्गत तसेच प्रवेशद्वारावर असणार्‍या टोल नाक्यावर लागणार्‍या वेळेत वाहन चालकांची ५० टक्के वेळेची बचत होईल. महत्वाचे म्हणजे फास्ट टॅगच्या यंत्रणेमुळे राष्ट्रीय महामार्गावरही प्रवास करणे शक्य होणार आहे.

फास्ट टॅगची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) कडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर एमएसआरडीसी आणि एनएचएआयमध्ये करार होणे अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय बँकाचा दर्जा असलेल्या बँकामध्ये हे फास्ट टॅग उपलब्ध होतील. प्रत्येक फास्ट टॅगसाठी १०० रूपये आकारण्यात येतील. एमएसआरडीसीने फास्ट टॅगच्या वापरासाठीची सर्व पुर्तता करतानाच एनएचएआयकडे परवानगी मागितली आहे. एनएचएआयच्या परवानगीनंतर या फास्ट टॅगची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती सह व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली. मुंबई पूर्व उपनगरात मुलुंड टोलनाका, पश्चिम उपनगरात दहिसर टोलनाका तसेच वाशी टोल नाका आणि वांद्रे वरळी सी लिंक याठिकाणी सध्याचे ईटीसी टॅग बदलून फास्ट टॅग उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

सध्याचे ईटीसी टॅगधारकांचा प्रीपेड बॅलेन्सची रक्कम संपल्यानंतर फास्ट टॅगचा पर्याय वाहन चालकांना मिळेल. त्यासाठी नजीकच्या बँकेतून हा फास्ट टॅग विकत घ्यावा लागणार आहे. सध्या मुंबईतील ईटीसी टॅग पासधारकांना त्यांचे सध्याचे पासचे पैसे वापरण्यासाठी काही कालावधी देण्यात येईल. त्यानंतरच फास्टटॅगचा पर्याय पूर्णपणे अंमलात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -