घरमुंबईवाहतूक पोलिसाच्या मारहाणीत पितापुत्राला अटक

वाहतूक पोलिसाच्या मारहाणीत पितापुत्राला अटक

Subscribe

‘नो एंट्री झोन’ मध्ये मोटार चालवणार्‍यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना शुक्रवारी दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथे घडली. या मारहाणीत पोलीस हवालदाराच्या कानातून रक्तस्राव होऊन त्यांचा एक कान बधिर झाला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी वाहन चालक पितापुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ताडदेव वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सानप हे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दक्षिण मुंबईतील पेडर रोड, केम्स कॉर्नर या ठिकाणी कर्तव्य पार पाडत होते. दरम्यान एमएच-०१ बीवाय – १६२९ हि मोटार नो एंट्री मधून येत असताना सानप यांनी मोटार थांबवून कारवाईसाठी मोटारीचा नंबरप्लेटचा फोटो काढला. मोटारीतून दोघे जण बाहेर आले व त्यांनी सानप यांच्या सोबत वाद घालत धक्काबुकी केली. दुसर्‍याने सानप यांच्या कानशिलात लगावून दिली. यामुळे सानप यांच्या कानातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा एक काम बधिर झाला. त्या ठिकाणी गोळा झालेल्या नागरिकांनी वाहतूक पोलीस हवालदार सानप यांची मारहाण करणार्‍या पितापुत्रालाच्या तावडीतून सुटका केली.

- Advertisement -

या मारहाणीत जखमी झालेले पोलीस हवालदार सानप याना नजीकच्या रुग्नालयात उपचारासाठी आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वाहन जय मुनवाणी आणि जशान मुनवाणी या पितापुत्राला अटक कऱण्यात आली आहे.

कर्तव्य बजावताना पोलिसाना मारहाण करण्याचे प्रकार पुन्हा एकदा मुबंईत वाढले असून वाहन चालकांना वाहतूक पोलिसाचा कुठलाही धाक राहिलेला नसून वाहतूक पोलिसाचा रस्त्यावर सर्वांसमोर अपमान करून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते, त्यांना मारहाण करून वर्दी उतरवण्याची धमकी दिली जात असल्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याचे एका अधिकार्‍याने दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -