घरमुंबईझोमॅटो, फुडपांडासह १२२ कंपन्यांवर FDA ची कारवाई!

झोमॅटो, फुडपांडासह १२२ कंपन्यांवर FDA ची कारवाई!

Subscribe

ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या नामांकित कंपन्या परवाना नसलेल्या कंपन्यांमधून अन्नपदार्थ पुरवत आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली आहे.

झोमॅटो, फूडपांडा, उबर आणि स्विगी या ऑनलाईन फुड पुरवणाऱ्या मुंबईतील १२२ कंपन्यांवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे. या कंपन्यांनी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई केली गेली.

मुंबईतल्या ३६६ अशा कंपन्यांची पाहणी केली गेली होती. त्यातील १२२ कंपन्यांवर काम बंद करण्याची कारवाई एफडीएकडून करण्यात आली. स्वीगी आणि झोमॅटो यांच्याविरूद्ध २६ खटले दाखल केले. यातून एकूण एक कोटी ५१ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या नामांकित कंपन्या परवाना नसलेल्या कंपन्यांमधून अन्नपदार्थ पुरवत आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली आहे.

- Advertisement -

ऑनलाईन फुडची वाढतेय मागणी

अनेकदा आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा आला की आपण ऑनलाईन फूड जेवण मागवतो. पण, आपल्याला हे माहित नसतं हे की जेवण नक्की कुठून येतं ? हे अन्नपदार्थ किती सुरक्षित आहेत ? मुंबईसह अनेक ठिकाणी ऑनलाईन फूड पुरवलं जातं. पण, ते अन्न सुरक्षित आहे की नाही यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी माहिती देताना सांगितलं की, अन्न आणि औषध प्रशासनाने २०१८ मध्ये ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या कंपन्यांचं सर्वेक्षण केलं. यावेळी अनेक नामांकित कंपन्यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याचं निद्रर्शनास आलं. मुंबईत एकूण ३६६ आस्थापनांची तपासणी केली. तसंच, १२२ आस्थापनांवर व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली. तसंच, पुणे जिल्ह्यात २ विनापरवाना आस्थापनांकडून अन्न पदार्थ खरेदी केल्याप्रकरणी स्विगी आणि झोमॅटोविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ”

जयकुमार रावल यांनी पुढे सांगितलं, “स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाईन अन्न पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी विनापरवाना आस्थापनांकडून अन्नाचा पुरवठा केल्याने स्विगी कंपनीविरोधात ५९ न्यायनिर्णय प्रकरणं आणि झोमॅटो या कंपनीविरुद्ध २६ न्यायनिर्णय प्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी दाखल करण्यात आली आहेत. तसंच, या प्रकरणात १९ छोट्या अन्न व्यावसायिकांविरोधात तडजोड प्रकरणं दाखल करून १,५१,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईतील झोमॅटो मीडिया प्रा. लि. या आस्थापनाविरोधात विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -