घरमुंबईबेकरी, मिठाई दुकाने आणि इतर अन्न आस्थापना ‘ट्रान्सफॅट मुक्त’ करा

बेकरी, मिठाई दुकाने आणि इतर अन्न आस्थापना ‘ट्रान्सफॅट मुक्त’ करा

Subscribe

बेकरी, मिठाई दुकाने आणि इतर अन्न आस्थापनामधून ‘ट्रान्सफॅट मुक्त’ करण्याचे निर्देश अन्न व्यावसायिकांना अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहे.

दररोजच्या आहारामध्ये खाद्यतेल हा प्रमुख घटक असतो. तो निश्चितपणे शुद्ध आणि भेसळ विरहीत असणे गरजेचे आहे. बेकरी, मिठाई दुकाने आणि इतर अन्न आस्थापनामधून ‘ट्रान्सफॅट मुक्त’ करण्याचे निर्देश अन्न व्यावसायिकांना अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहे. तसेच, ट्रान्सफॅट मुक्त असे फॅट आणि तेल वापरण्यासाठी एफडीएकडून प्रोत्साहन दिले जात आहे. जेणेकरून अन्नपदार्थांमधील इंडस्ट्रियल ट्रान्सफॅट हा घटक कमी होईल. अन्न व्यावसायिकांना ‘ट्रान्सफॅट मुक्त अन्नपदार्थ’ लोगो दर्शनी ठिकाणी लावण्याचे एफडीएने आदेश दिले आहेत.

‘ट्रान्सफॅट मुक्त अन्नपदार्थ’ चिन्ह दर्शनी ठिकाणी लावण्याचे एफडीएचे आदेश

इंडस्ट्रियल ट्रान्सफॅट हे विषारी घटक आहे. यामुळे ह्रदयविकार आणि ह्रदयाशी संबंधित इतर विकार होतात. त्याची निर्मिती ही हायड्रोजनेशन ऑफ व्हेजीटेबल ऑइल या प्रक्रियेद्वारे तसेच उच्च तापमानास तेल तापवल्याने होते. इंडस्ट्रियल ट्रान्सफॅट हे मोठ्या प्रमाणात पर्शियाली हायड्रोजनेटेड फॅट हे मार्गारिन, बेकरी शोर्टनिंग (बेकरी पदार्थ तयार करताना) आणि वनस्पती तेल (मिठाई आणि तळलेले पदार्थ तयार करताना) यामध्ये आढळतात. अन्न आस्थापना उपरोक्त नियमानुसार ट्रान्सफॅट मुक्त मेद आणि तेल वापरतात आणि ज्यामध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण ०.२ ग्रॅम प्रती १०० ग्रॅम पेक्षा जास्त नसते.

- Advertisement -

खाद्यतेलाचे जास्त प्रमाण असलेले अन्नपदार्थाचे हळूहळू नियोजित करण्याचे काम सुरू आहे. फॅट आणि तेलामधील ट्रान्सफॅटचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत मर्यादा असून त्याची मर्यादा २०१२ पर्यंत ३ टक्के आणि २०२२ पर्यंत २ टक्के करण्याचे काम चालू आहे. अन्न व्यावसायिकांनी ‘ट्रान्सफॅट मुक्त अन्नपदार्थ’ असा लोगो प्रदर्शित करणे हे अति महत्त्वाचे आहे. अन्न सुरक्षा व मानदे (जाहिराती आणि दावा) नियमन २०१८ नुसार ज्या अन्नपदार्थांमध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण ०.२ ग्रॅम प्रती १०० ग्रॅम किंवा १०० मिली आहे, असे अन्नपदार्थ हे ट्रान्सफॅट मुक्त असल्याचा दावा करू शकतात. अन्न सुरक्षा व मानदे (जाहिराती आणि दावा) नियमन २०१८ मधील नमूद तरतुदींचे पालन करण्याची जबाबदारी अन्न व्यावसायिकांची राहील.  – डॉ. पल्लवी दराडे; अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त


हेही वाचा  – गणेशोत्सवासाठी एफडीए सज्ज; बाप्पांच्या प्रसादावर असणार करडी नजर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -