घरताज्या घडामोडीमुंबई विमानतळावर फेडएक्स विमान धावपट्टीवरुन घसरले

मुंबई विमानतळावर फेडएक्स विमान धावपट्टीवरुन घसरले

Subscribe

छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान रनवेपासून पुढे गेल्याची घटना आज घडली. बंगळुरू येथून मुंबईत आलेल्या मालवाहू विमानाच्या बाबतीत ही घटना घडली. फेडेक्स फ्लाईट ५०३३ हे विमान बंगळुरू येथून मुंबईत दाखल झाल्यानंतर हा प्रकार घडला. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज विमानतळावरील उड्डाणे काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे मोठा अपघात टळला.

या घडलेल्या प्रकारानंतर या विमानाला टोविंग करून रनवेवरून हटवण्यात आले. पण या विमानाच्या रनवे क्रॉसिंगच्या झालेल्या प्रकारामुळे फ्लाईट ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर दुपारी २.३० ते ७ या कालावधीत कोणत्याही फ्लाईट्सचे ऑपरेशन होणार नाही, हे ठरल्याने दिवसभरात अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या. आज दिवसभरात फक्त १९ फ्लाईट्स ऑपरेट करण्याचे मुंबईचे वेळापत्रक होते. त्यापैकी ११ फ्लाईट्सचे डिपार्चर आणि ८ फ्लाईट्सचे अरायव्हल अपेक्षित होते.

- Advertisement -

निसर्ग चक्री वादळामुळेच हा सावधगिरीचा पर्याय म्हणून फ्लाईट्सची संख्या कमी करण्याचा पर्याय ठेवण्यात आला होता. एअर एशिया, एअर इंडिया, इंडिगो, गो एअर आणि स्पाईस जेट या विमान कंपन्यांमार्फत फ्लाईट्स ऑपरेट करण्यात येणार होत्या. मंगळवारी नियोजित २० फ्लाईट्सपैकी १७ फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबई एअरपोर्टमार्फत २५ मे पासून एकूण ५० फ्लाईट्स दररोज हाताळण्यात येत आहेत. त्यामध्ये २५ फ्लाईट्स अरायव्हल तर २५ फ्लाईट्सचे टेक ऑफ असे वेळापत्रक होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -