ठाणे स्टेशनच्या वनरुपी क्लिनिकमध्ये महिलेची सुखरूप प्रसूती

Mumbai

रेल्वे किंवा रस्ते प्रवासात अचानक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर रुग्णांना वनरुपी क्लिनिक वरदान ठरत आहे.
ठाणे स्टेशनच्या बाजूला सुरू केलेल्या वनरुपी क्लिनिकमध्ये गुरुवारी एका महिलेची सुखरूप नॉर्मल प्रसूती झाली. वनरुपी क्लिनिकमध्ये दहावी प्रसूती ठरली.

ठाणे रेल्वे स्थानकातील वनरुपी क्लिनिकमध्ये पुन्हा एकदा महिलेची प्रसूती झाली असून या महिलेने मुलाला जन्म दिला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने कर्जत येथील सुभान्ती पात्रा (29) ही महिला मुंबईतील परेल येथील रूग्णालयात चालली होती. पण लोकल गाडीमध्ये प्रसूती कळांमध्ये वाढ झाल्याने तिला ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून वनरुपी क्लिनिकमध्ये नेण्यात आले.

तिथे डॉ. सलमान यांनी परिचारिकांच्या मदतीने त्यांची नॉर्मल प्रसूती केली. ते दोघे ही सुखरूप असून पुढील उपचारार्थ त्या मायलेकांना शासकीय रुग्णालयात हलवले. क्लिनिकमधील ही दहावी प्रसूती असल्याची माहिती क्लिनिकचे संचालक डॉ. राहूल घुले यांनी दिली.