घरमुंबईतेरा वेळा गर्भपातानंतर झालं बाळ

तेरा वेळा गर्भपातानंतर झालं बाळ

Subscribe

सूर्या हॉस्पिटलमध्ये इंट्राव्हॅस्क्यूलर ट्रान्स्फ्यूझन इन्कम्पॅटिबिलिटी उपचाराला यश

तब्बल आठ वेळा गर्भपाताचा अनुभव, नंतर तीन वेळा गर्भ वाचवण्याच्या प्रयत्नात झालेला गर्भपात अनुभव ३२ वर्षांच्या रुपाली रोहित गुरव यांच्यासाठी अंगावर काटा उभा करणारा होता. पण, तेराव्या वेळी औषधांची आणि प्रयत्नांच्या जोडीने तिला बाळ झाले. लग्नानंतर अपत्यप्राप्ती लगेच व्हावी, अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. पण, सलग आठ वेळा रुपालीचे गर्भपात झाले होते. तर, इतर प्रयत्न सुरू असूनही यश येत नव्हते. पण, गुरव कुटुंबियांचा विज्ञानावरील विश्वास याठिकाणी जिंकला आणि त्यांना तेराव्या वेळी अपत्यप्राप्ती झाली.

- Advertisement -

जोखीमीनंतर गर्भारपणाचा काळ सुरळीत 

मुंबईतील सांताक्रुझ येथील सूर्या हॉस्पिटलच्या फिटल मेडिसीन सेंटरमधील इंट्राव्हॅस्क्यूलर ट्रान्स्फ्युझन इन्कम्पॅटिबिलिटी उपचाराने रुपालीला आई करण्याची जोखीम सहज पेलली. याविषयी सूर्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वंदना बन्सल यांनी सांगितलं की, ” रूपालीच्या प्रकरणात आव्हानात्मक गुंतागुंत होती. त्यासाठी एक योजना तयार करण्यात आली. त्यानुसार, तिला फिटल मॅटर्नल मेडिसीन युनिटमध्ये ठेवायचे ठरले. दरम्यान, तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. तिला हेपेरीन आणि अॅस्पिरीनचा (दोन्ही रक्त पातळ करणारी औषधे) सौम्य डोस सुरू होता आणि नियंत्रित डायबेटिक आहार दिला जात होता. त्यामुळे गर्भारपणाचा सुरुवातीचा काळ सुरळीत पार पडला. तिचा ८ वेळा गर्भपात झाला होता त्यामुळे अनेक आव्हानं होती. ”


हेही वाचा – भीषण! पोटच्या मुलांच्या समोरच पतीने केला गर्भवती पत्नीचा खून


तेराव्या वेळी औषधांसह प्रयत्नांच्या जोडीने झाले बाळ

अनेकदा झालेल्या गर्भपातामुळे गर्भ नाजूक अवस्थेत होता. त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त संक्रमण करण्यास अवघड झाले होते. तरीही १८ आठवड्यात त्याला रक्त संक्रमण केले. गर्भाला १८ व्या आठवड्यात रक्त संक्रमण करण्याच्या घटना जगात खूपच कमी आहेत. बाळाचा जन्म होईपर्यंत कमीत कमी ५ ते ६ वेळा विशिष्ट रक्त संक्रमणे करावी लागले. याच काळात आईला ३ इन्ट्रायुटेराईन ट्रान्सफ्यूजन्स करावी लागली. २९ व्या आठवड्यात रुपाली यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. ट्रान्सफ्यूजननंतर, हिमोग्लोबिन २२ ग्रॅम असताना तिने १.२ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर, त्यांना पुढील देखभालीसाठी निओनेटल इन्टेंसिव्ह केअर युनिटमध्ये हलवण्यात आले. रुपाली यांना तेराव्या वेळी औषधांची आणि प्रयत्नांच्या जोडीने बाळ झाले. यावेळी रुपाली यांच्या कुटुंबियांनी दिवाळी साजरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -