घरमुंबईफ्लॅटच्या नावाने पंधरा लाख रुपयांची फसवणुक

फ्लॅटच्या नावाने पंधरा लाख रुपयांची फसवणुक

Subscribe

भांडुप येथील घटना; दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : भांडुपच्या निलयोगी कंस्ट्रक्शनच्या इमारतीमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाने एका व्यक्तीला दोन भामट्यांनी सुमारे पंधरा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

हा संपूर्ण व्यवहार मे २०१३ ते २६ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत भांडुपच्या एलबीएस रोडवरील ड्रिम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावरील आरोपींच्या कार्यालयात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिल श्रीकांत देवटी हे डोंबिवलीतील न्यू मॉडेल कॉलेज, शंकेश्वर पार्क सहकारी सोसायटीमध्ये राहतात. मे २०१३ रोजी त्यांची दोन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या दोघांनी भांडुप येथील निलयोगी कंन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीमध्ये त्यांना एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांच्याकडून सतरा लाख रुपये घेतले होते.

- Advertisement -

ही रक्कम घेतल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचा करार झाला होता. मात्र पाच वर्ष उलटूनही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही या दोघांनी परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही टोलवाटोलवी करीत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले, मात्र पंधरा लाख रुपये देत नव्हते. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच अखेर त्यांनी भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही भामट्याविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -