घरमुंबईअंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप

अंजली दमानियांवर खडसेंचा फसवणुकीचा आरोप

Subscribe

एकनाथ खडसे आणि अंजली दमानियांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आता आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी थेट अंजनी दमानिया यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी माझ्या विरोधात ९.५ कोटी रूपयाचे बनावट चेक तयार केले. त्यानंतर ते न्यायालयामध्ये सादर केले. याबाबतची माहिती मिळताच मी जळगाव पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून त्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीमध्ये सदरचे चेक बनवाट असल्याचे तसेच चेक ज्या बँकेचे आहेत ती बँके लिक्विडेशन अॅक्टखाली आहे. त्यामुळे हजार रूपयाच्या वरती व्यवहार करता येणार नाहीत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व चेक हे बनावट आहेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. पण, महिन्यानंतर देखील याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यापेक्षा चौकशी अधिकाऱ्याकडून तपासाचे अधिकार काढून घेण्यात आल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. हे सारं प्रकरण संशयास्पद असून स्थानिक न्यायालयानं याची दखल घेतली नसून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद हा जुना आहे. एकनाथ खडसे यांचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी तसे आरोप केले होते. शिवाय, ज्या नंबरवरून खडसेंना फोन आला होता तो नंबर देखील अंजली दमानिया यांनी सादर केला होता. मनिष भंगाळे या हॅकरनं एकनाथ खडसेंना दाऊदचा फोन आल्याचा दावा केला होता. त्यामुळे खडसेंसमोर मोठा पेच देखील निर्माण झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. शिवाय, सध्या भोसरीतील जमिन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर देखील एकनाथ खडसे यांना आपलं पद गमवावं लागलं आहे. त्यानंतर अद्याप देखील एकनाथ खडसे यांची राजकीय संन्यास सुरूच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -