Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिव-मनसैनिकांमध्ये राडा

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिव-मनसैनिकांमध्ये राडा

Related Story

- Advertisement -

वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवांचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भरसभेत राडेबाजी केली. आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या अशी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या समोरच राडा केला. याचवेळी पोलीस आणि शिवसैनिकांनी दोन मनसे कार्यकर्त्यांना चोपही दिला. पोलिसांनी लगेच या दोन्ही कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवही वसईत आले होते. यावेळी त्यांनी वसई पोलीस ठाण्यातच परिवहन सेवेचा कार्यक्रम संपेपर्यंत थांबवण्यात आले होते.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे वसईत आले होते. मंगळवारी दुपारी वसईच्या वसंत नगरी मैदानात कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

- Advertisement -

आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. ‘आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही कार्यकर्त्यांना चोप देत बाहेर नेले. या नंतर पुढील कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याचे पोलिसांना कुणकुण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले होते. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

- Advertisement -

कार्यक्रमात घोषणाबाजी देणार्‍या दोन कार्यकर्त्यांची धरपकड करताना पोलिसांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी तुळींज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन निषेध केला. मनसैनिक आक्रमक झाल्याने नालासोपार्‍यातील वातावरण काही काळ तापले होते.

- Advertisement -