Video: डोंबिवली पादचारी पुलावर फ्रीस्टाईल हाणामारी; तिघेजण जखमी

जखमी तिघांच्या हातावर आणि पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू

Dombivli

डोबिंवली रेल्वे स्थानक परिसरात बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमधील हाणामारीची घटना ताजी असतानाच, गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास डोंबिवली पादचारी पुलावर खाद्यपदार्थ विक्रेते आणि ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीत तिघेजण जखमी झाले आहेत. विकास नवले (वय २७), मिलींद घोलप (वय २६) आणि अनिल चंदनशिवे (वय २८) अशी जखमींची नावे आहेत. या तिघांच्या हातावर आणि पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

…त्यानंतर परिस्थिती जैसे थे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू असल्याचा डंका पिटला जात असला तरी आजही फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत. डोंबिवली रेल्वे पादचारी पूलावर फेरीवाले मोठया संख्येने बसलेले असतात. त्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना पुलावरून चालणेही जिकरीचे होते. जणू काय हा पूल फेरीवाल्यांना आंदण दिला कि काय ? अशीच अवस्था दिसून येते. एखादा प्रसंग घडला की पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला जाग होते. त्यांच्याकडून एक-दोन दिवस कारवाई केली जाते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे.. पुलावर बसणा-या फेरीवाल्यांवर ना-पालिका ना-रेल्वे पोलीस…कोणाकडूनही कारवाई केली जात नाही.

डोंबिवलीत पादचारी पुलावर हाणामारी, 3 जण जखमी; विक्रेते आणि ग्राहकांमध्ये झाली बाचाबाची

डोंबिवलीत पादचारी पुलावर हाणामारी, 3 जण जखमी; विक्रेते आणि ग्राहकांमध्ये झाली बाचाबाची

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ನವೆಂಬರ್ 7, 2019

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी

रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पुलावर फेरीवाल्यांचा बाजार भरतो त्यात खाद्यपदार्थांच्या गाडयाही लावल्या जातात. विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नेहमीच वादावादी होत असतात. त्यातूनच मध्यरात्री हा प्रकार घडला. मात्र या वादाचे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जबर जखमी झाले आहेत. ही धुमश्चक्री जवळपास अर्धा तास सुरू होती. जखमी तिघांनाही पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची चौकशी आणि जबाबचे काम सुरू असल्याचे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांनी सांगितले. मात्र डोंबिवलीतील या दुस- या घटनेनंतर तरी पालिका आणि पोलीस प्रशासनाला जाग येईल का ? असाच सवाल उपस्थित होत आहे.


भिवंडीत नामवंत कंपन्यांचे २५ कोटींचे पेकेजिंग मटेरियल पोलिसांकडून जप्त

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here