58 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai
police case
प्रातिनिधिक फोटो

 सुमारे 58 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका व्यापार्‍याविरुद्ध धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पंधरा हजार नॉन लेदरची लॅपटॉप बॅगेची परस्पर विक्री करुन त्यातून आलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोपी व्यापार्‍यावर आरोप आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमेाहीम सुरु केली आहे. रिझवान मुनाफ हकीम हे कुर्ला येथील मसराणी रोडवरील हंस रेसीडेन्सीच्या फ्लॅट क्रमांक 401 मध्ये राहतात.

त्यांचा धारावीतील शीव-वांद्रे लिंक रोडवरील काळा किल्ला, रमादेवी हनुमानसिंग चाळीत बॅग बनविण्याचा कारखाना आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची आरोपीशी ओळख झाली होती. ते व्यवसायाने व्यापारी असल्याने त्यांच्यात व्यवहार सुरु झाला होता. 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर 2013 या कालावधीत त्याने रिझवान हकीम यांच्याकडून पंधरा हजार नॉन लेदरची लॅपटॉप बॅग घेतले होते. 390 रुपये या दराने पंधरा हजार बॅगेचे पार्सल त्यांनी आरोपीच्या सांगण्यावरुन पाठविले होते. मात्र या बॅगेची परस्पर विक्री करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती.

त्यांना दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. चौकशीनंतर त्यांना आरोपीने या बॅगेची मार्केटमध्ये विक्री केली होती. ही रक्कम त्यांना न देता त्यांची 58 लाख 50 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे निदर्शनास येताच रिझवान यांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी व्यापार्‍याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे अन्य काही व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here