घरमुंबईमुंबईत दारूड्याने BMW ठोकली, २ जण जखमी

मुंबईत दारूड्याने BMW ठोकली, २ जण जखमी

Subscribe

मद्यधुंद अवस्थेत चालकाने चालवली आलिशान बीएमडब्ल्यू कार,चालकाला पकडण्यासाठी पोलीसांचा चार किलोमीटरचा थरार.

मुंबईतल्या रे रोड ते किडवाई परिसरात पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे अपघात झाला. या अपघातात चार गाड्यांचे नुकसान झाले असून २ जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये आलिशान BMW कार चालवत होता. दारूच्या नशेत असल्यामुळे चालकाच्या हातातून गाडीचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या अपघातात BMW गाडीचेही नुकसान झाले आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्याची संख्या जास्त असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहमुद आलम असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. या घटनेविषयी माहिती देताना पोलीस म्हणाले, ‘आरोपी आलमला पकडण्यासाठी आम्ही त्याच्या BMW कारचा पाठलाग करत होतो. सुमारे ४ किलोमीटरपर्यंत आम्ही त्याच्या गाडीचा पाठलाग केला.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळ चाललेल्या या पाठलगानंतर शेवटी पोलिसांनी आलमला रोखले आणि ताब्यात घेतले. आलम हा संबंधीत बीएमडब्ल्यू कारच्या मालकाचा ड्रायव्हर आहे. BMW गाडीचा मालक शनिवारी कामानिमित्त दुबईकडे रवाना झाला. त्यानंतर आलम गाडी घेऊन परत येत असताना दारु प्यायलेल्या अवस्थेत होता. दारुच्या नशेतच त्याच्याकडून हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय घडल्या प्रकाराबाबत आलमवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

वाचा: हाती लिहीला नोकरीचा अर्ज, बदलले तरुणाचे नशीब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -