अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाली. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा निकालही तातडीने लावला. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका विद्यापीठाकडून देण्यात आली नाही.

coronavirus the mumbai university will be help to state government

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाली. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा निकालही तातडीने लावला. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका विद्यापीठाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने गुणपत्रिका द्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात कोरोनामुळे झालेल्या गदारोळानंतर अखेर राज्य सरकारने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये परीक्षा घेतल्या. कोरोनामुळे एप्रिल-मेमध्ये होणार्‍या परीक्षा यंदा विलंबाने घेण्यात आल्या. परीक्षा विलंबाने झाल्या असल्या तरी परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून तातडीने लावण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका देण्यात आली नाही. गुणपत्रिका नसल्याने पुढील शिक्षण अथवा नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्राद्वारे केली आहे.