घरमुंबईनिवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला यश; थकित विद्यावेतन मिळाले

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला यश; थकित विद्यावेतन मिळाले

Subscribe

निवासी डॉक्टरांचे थकित विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून देण्यात आले असल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड प्रतिनिधींकडून देण्यात आली.

गेले काही महिने थकित विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आजउद्या मिळणार असे म्हणत असतानाच निवासी डॉक्टरांचे थकित विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून देण्यात आले असल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड प्रतिनिधींकडून देण्यात आली. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तीन महिन्यांचे विद्या वेतन राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना देण्यात आले नव्हते. यासाठी निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने संचलनालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र १५ एप्रिल रोजी हे थकित विद्यावेतन देण्यात आले आहे. यातील काही वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना दोन महिन्यांचे तर काही महाविद्यालयांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात आले आहे.

अनेक प्रयत्नांनी विद्यार्थ्यांचे थकीत विद्यावेतन दिले जात आहे. पण, निवासी डॉक्टरांना अशा अडचणींना सामोरे का जावे लागत आहे. संचालनालयाकडून विद्यावेतनासाठी आधीच तजवीज करून का ठेवली जात नाही.
– डॉ. कल्याणी डोंगरे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना

- Advertisement -

मार्ड संघटनेच्या आंदोलनाला यश

या थकित विद्यावेतनासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने ४ एप्रिलला आंदोलन केले होते. पण, त्यावेळेस विद्यावेतनासाठी निधी नसल्याचे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे, या निधीबाबत निवासी डॉक्टर सवाल उपस्थित करत आहेत. तर, एप्रिल आणि मे महिन्यांचा विद्यावेतन मिळण्याबाबत साशंकता उपस्थित करण्यात येत आहे. यात अकोला महाविद्यालयाचा एक महिन्याचा तर अंबेजोगाई आणि लातूरच्या महाविद्यालयांचा प्रत्येकी दोन महिन्यांचे विद्यावेतन खुले करण्यात आले असल्याची मााहिती मध्यवर्ती मार्ड अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -