निवडणुकीचे काम नाकारणार्‍या शिक्षकांसह 26 जणांवर FIR

Mumbai
polling
निवडणुक

निवडणुकीचे काम करण्यास नकार देणार्‍या सोपारा इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांसह 26 जणांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

29 एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी करणे यांसह निवडणुकीची विविध कामे करण्यासाठी केंद्र स्तरावर निवडणूक आयोगाने कामे दिली होती. ही कामे करण्यास नालासोपारा येथील सोपारा इंग्लिश स्कूलमधील 26 कर्मचार्‍यांनी नकार दिला. त्यामुळे येथील 132 संघांच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी गुलाबचंद भोई यांनी मंगळवारी रात्री या सर्वांविरोधात तक्रार दाखल केली. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण पाटील, सुरेश राठोड, राजेंद्र घरत, अमोल रावते, अभिमन्यु पवार, नरेंद्र वाघ, आरुन महाले, किशोर अंगारके, विनायक जोशी, संतोष पाटील, अर्चना शेस, अंकुश वळवी, राजेश लोखंडे, राजेंद्र गोसावी, विल्यम लोपीस, सुनील म्हात्रे, हेमलता साळुंखे, भारती हातोडे, दीपाली पाटील, अरुणा शेवाळे, प्रतिभा सोनावणे, अरुण दिवर, सुनंदा सोनावणे, संध्या पाटील, अनघा कवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.