अभिनेत्रीकडे केली शारिरीक सुखाची मागणी 

पवई येथे राहणाऱ्या एका अभिनेत्रीकला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून शारिरीक सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai
woman-molestration-768x430
अभिनेत्रीकडे केली शारीरिक सुखाची मागणी 

गेल्या आठ महिन्यांपासून विविध मोबाईल क्रमांकावरुन कॉलद्वारे एका विवाहीत अभिनेत्रीला त्रास देणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या व्यक्तींनी अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे सतत शारिरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप या अभिनेत्रीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. मोबाईल क्रमांकावरुन या दोन्ही आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

पवई परिसरात ३ वर्षांची पिडीत अभिनेत्री तिच्या पतीसोबत राहते. तिच्या पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे तर ती अभिनेत्री म्हणून काम करते. तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्यात त्याने तिला एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून या कामाचे तिला पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याच्यासोबत तिला एक रात्र काढावी लागेल, अशी अट घातली होती. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याने तिने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. मात्र नंतर तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमाकांवरुन दोन व्यक्तीकडून सतत कॉल केले जात होते. ते दोघेही तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी करीत होते. तिने त्यांची मागणी मान्य केली नाहीतर तिला सिनेमा मिळू देणार नाही अशी धमकी देखील दिली होती. इतकेच नव्हे तर तिला सतत अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिचा मानसिक शोषण करीत होते.

मंगळवारी ११ जूनला सायंकाळी ती तिच्या पती आणि मित्रांसोबत जोगेश्वरीतील कॅफे कॉफी डे जवळ आली होती. यावेळी पुन्हा या दोन्ही व्यक्तींचा तिला फोन आला. यावेळी त्यांनी तिच्या मोबाईलवर काही अश्लील व्हिडीओ पाठविले होते. हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने या दोन्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह अन्य भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर ओशिवरा पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकावरुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. लवकरच या दोन्ही आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – पार्थ यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हायरल;संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

हेही वाचा – ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल