घरमुंबईवांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग; ८४ जणांची सुखरुप सुटका

वांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग; ८४ जणांची सुखरुप सुटका

Subscribe

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत १०० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मानखुर्दच्या मंगलमूर्ती वसाहतीतील अॅक्सिस बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना शनिवारी घटली होती. तर काल, रविवारी कुलाबा येथील चर्चिल चेंबर इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. वांद्रे पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीच्या घटनास्थळी १४ गाड्या रवाना झाल्या असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर १०० जण अडकल्याची भिती

वांद्रे येथील एमटीएनएलची इमारत ९ मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला असून घाबरलेले कर्मचारी जीव मुठीत घेऊन वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले आहेत. त्यामुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर १०० जण अडकल्याची शक्यता असून अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुखरुप बाहेर काढत आहेत. तर या आगीच्या घटनेत अडकलेले काही कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून आगीच्या धुरापासून बचाव करत आहेत. दरम्कायान काही कर्मचारी खिडकीजवळ येऊन वाचवा वाचवा अशा हाका मारत आहेत. तर अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या मदतीने अडकलेल्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -