घरमुंबईकुलाब्यातील चर्चिल चेंबरला आग; एकाचा मृत्यू

कुलाब्यातील चर्चिल चेंबरला आग; एकाचा मृत्यू

Subscribe

ताज हॉटेल जवळ असणाऱ्या चर्चिल चेंबर इमारतीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शाम अय्यर या ५४ वर्षीय रहिवासीचा मृत्यू झाला आहे. ही आग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती. ही इमारत ताज हॉटेलच्या बाजूला आहे. या इमारतीत बरेच लोक अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. घटनेस्थळी बचावकार्य सुरु आहे. ही आग कशामुळे लागली, या मागील कारण अद्याप कळालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. आतापर्यंत १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -