Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी गिरगावच्या एचएन रुग्णालयाला आग

गिरगावच्या एचएन रुग्णालयाला आग

मुंबईच्या गिरगावमधील एचएन रुग्णालयाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागली असून याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Mumbai
fire at H.N reliance foundation hospital in girgaon
गिरगावच्या एचएन रुग्णालयाला आग

मुंबईच्या गिरगावमधील एचएन रुग्णालयाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून रुग्णालयातील बहुतांश रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान, काही वेळाने या आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आले.

एचएन रुग्णालयाच्या अंदाजे चौथ्या मजल्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याचे कळते. आग लागल्याच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना होत, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, ही आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here