घरमुंबईवाड्यातील हिंदुस्थान पेट्रो कंपनीला आग

वाड्यातील हिंदुस्थान पेट्रो कंपनीला आग

Subscribe

कोट्यवधी रुपयांचे नुकसान, जीवितहानी नाही

वाडा तालुक्यातील बिलोशी गावाच्या हद्दीत असलेल्या हिंदुस्थान पेट्रो फोम या कंपनीला सोमवारी रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. ज्यात कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान मात्र झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्या तरी तोवर कंपनी जळून खाक झाली होती.

हिंदुस्थान पेट्रो फोम नावाची फोम उत्पादन करणारी एक भलीमोठी कंपनी बिलोशी गावाच्या हद्दीत असून वर्षभरापूर्वी ही कंपनी येथे नव्याने स्थलांतरित करण्यात आली होती. सोमवारी 2 च्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. आधीच केमिकल व फोम या अतिशय ज्वलनशील वस्तूंनी भरलेली कंपनी काहीच वेळात आगीच्या भक्षस्थळी सापडली. तात्काळ वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र घटनास्थळी येईतोवर कंपनी जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या व डझनभर कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न करून आगीला आटोक्यात आणले. ही आग इतकी भीषण होती की त्यात कंपनीतील सर्व उत्पादन, मशीन व लोखंडी शेड यासह कार्यालय व निवासस्थान जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. कंपनीचे मालकदेखील याच ठिकाणी आपल्या निवासस्थानात झोपले होते. मात्र निव्वळ दैव बलवत्तर म्हणून त्यांना जाग आली व बाहेर पडण्यात यश आले.

- Advertisement -

फोम व अन्य ज्वलनशील पदार्थ असल्याने आग रोखणे अवघड होऊन बसले. आमच्या कंपनीत असलेल्या फायर सेफ्टी यंत्रणांसोबत आमच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न केले. मात्र त्यात आम्हाला यश आले नाही. ही आग शॉक सर्किटने लागली असावी, असा अंदाज कंपनीचे मालक मदन बन्सल व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -