घरमुंबईगोरेगावः उद्योग नगरी इंडस्ट्री येथील शॅम्पूच्या कंपनीला आग

गोरेगावः उद्योग नगरी इंडस्ट्री येथील शॅम्पूच्या कंपनीला आग

Subscribe

घटनास्थळी ८ते १० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंबई येथील गोरेगाव पश्चिम भागात आग लागली आहे. ही आग गोरेगाव पश्चिम येथील उद्योग नगरी इंडस्ट्री येथील शॅम्पूच्या कंपनीला लागल्याची घटना घडली आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास लागलेली आग विझल्यानंतर पुन्हा नऊ वाजेदरम्यान या आगीने पेट घेतला. घटनास्थळी ८ते १० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.

दरम्यान, उद्योग नगरी इंडस्ट्री येथील शॅम्पूच्या कंपनीला लागलेल्या आगीमध्ये कोणती जिवीत हानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -