मुंबईच्या वांद्रे येथील Duruelo Convent School शाळेबाहेर उभ्या असलेल्या व्हॅनला आज सकाळी भीषण आग लागली. यामुळे शाळेच्या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्यातरी यात कुणी जखमी झाले नसल्याचे वृत्त कळले आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे व्हॅनमधून धूर निघायला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही वेळातच संपुर्ण व्हॅनने पेट घेतला.
मुंबईच्या वांद्रे येथील Duruelo Convent School शाळेबाहेर उभ्या असलेल्या व्हॅनला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून यात कुणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. pic.twitter.com/RB4a8T6kIl
— My Mahanagar (@mymahanagar) December 13, 2018
आणखी वाचा – वांद्रे येथील शास्त्री नगर झोपडपट्टीला आग
इतर घटना – नर्गिस दत्त नगरमध्ये दहा वर्षात ४९ हजार वेळा लागली आग