घरमुंबईकामगार रुग्णालयात अग्नितांडव; ८ जणांचा मृत्यू

कामगार रुग्णालयात अग्नितांडव; ८ जणांचा मृत्यू

Subscribe

अंधेरी मधील मरोळ या ठिकाणी कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्य झाला होता. मात्र आता या आकड्मृयात वाढ झाली असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोरआली आहे.

अंधेरी मधील मरोळ या ठिकाणी असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी सायंकाळी आग लागली. आग लागताच या ठिकाणी अग्नीशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. या आगीच्या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. पण उपचारादरम्यान दाखल केलेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ८ वर गेली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयातील लोकांना बाहेर काढणे कठीण झाले होते.

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रुग्णालयात अडकलेल्या लोकांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या घटनेमध्ये १४७ जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. कूपर, होली स्पिरीट, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा आणि सेव्हन हिल रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. तर या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींवर रुग्णालयात उपाचर सुरु आहेत.

- Advertisement -

कुपर रुग्णालयामध्ये चार रुग्ण दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकाच्या पाठीच्या कण्याला मार लागला आहे. त्याने स्वत: चा जीव वाचविण्यासाठी उडी मारली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जखमींमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचा ही समावेश आहे. तर दुसऱ्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये दाखल केलं आहे. तर एकाच कुटुंबातील चार जण या घटनेमुळे कुपर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यापैकी दोघं वडील निकृती कांबळे (६०) आणि मुलगी पूनम कांबळे यांना पोटदुखीच्या कारणामुळे कुपरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यांच्या कुटुंबातील सर्वच जण धूराचा त्रास आणि पोटदुखीमुळे वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. तर, कुपर रपग्णालयामध्ये दोन अनोळखी मृतदेह दाखल झाले आहेत. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पण त्यांच्या शरीरावर जखमा नसून त्यांना धूराचाच त्रास झाला आहे. – डॉ. राजेश सुखदेवे, कुपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी

वाचा – कामगार रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

- Advertisement -

वाचा – आणि त्यांना मृत्यूने गाठले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -