घरमुंबईभिवंडीमध्ये ब्रशच्या कंपनीला भीषण आग; ५ गोडाऊन जळून खाक

भिवंडीमध्ये ब्रशच्या कंपनीला भीषण आग; ५ गोडाऊन जळून खाक

Subscribe

कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑइल पेंट आणि ब्रशचा साठा ठेवण्यात आल्याने आग वाढत चालली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडीमध्ये ब्रश कंपनीला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जय माता दी कम्पाऊंडमधील कंपनीला आज पहाटे  भीषण आग लागली. काबावत ब्रश कंपनीला भीषण आग लागली असून कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑइल पेंट आणि ब्रशचा साठा ठेवण्यात आल्याने आग वाढत चालली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील जय माता दी कंपाऊंडमधील पहिल्या मजल्यावरील रंगकामासाठी वापरण्यात येणारे ब्रश बनविणाऱ्या कारखाना आणि गोदामाला भीषण आग लागली. पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान या आगीत पाच गोदामे जळुन खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग पहिल्या मजल्यावर असल्याने तेथे जाण्यासाठी मार्ग नसल्याने आग विझविण्यासाठी अजुनही चार ते पाच तास लागणार आहेत.
गोदामानजीकच्या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या खाली ठेवलेले सॅन्ट्रींगच्या उपयोगी येणारे बांबू वासे ठेवलेल्या ठिकाणी प्रथम ही आग लागली. तिची धग नजीकच्या J क्रमांकाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील कबावत या रंग कामाचे ब्रश बनविण्याच्या कारखान्यासह मोठ्या प्रमाणावर रंग आणि थिनर हे केमिकल साठविले असल्याने त्याने पेट घेतला. पाहता पाहता या पहिल्या मजल्यावरील एकूण पाच गोदाम या आगीत जळून खाक झाली. या आगीची माहिती नारपोली पोलीसांनी अग्निशामक दलास कळवताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
परंतू आगीने उग्ररुप धारण करीत असल्याने ठाणे १ अशा एकूण ३ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. मात्र आग पहिल्या मजल्यावर असल्याने तिथपर्यत पाण्याचा मारा करण्यात अडचणी येत असल्याने ही आग नियंत्रणात आणण्यासाठी किमान चार ते पाच तासाहून अधिक वेळ लागणार असुन या कंपनी आणि गोदामात काम करणारे सुमारे ४० कामगार तेथेच राहत असुन उन्हाळा असल्याने कामगार बाजुच्या इमारतीवरील टेरेसवर झोपले असल्याने जिवितहानी टळली. मात्र कामगाराचे कपडे, घरगुती साहित्य आणि पैसे जळन खाक झाले आहे.
सदरच्या आगीमुळे धुराचे मोठे लोट उंच आकाशात पसरत असुन ही आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असुन आगी पर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांना पोहचण्यात अडचणी पडत असल्याने या गोदाम कारखान्यातील संपुर्ण साहित्य जळुन खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन आग आटोक्यात आणण्यासाठी चार ते पाच तास लागू शकतात अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -