फटक्यांमुळे दोन कंपन्यांना लागली आग

विरार वसईमध्ये जळलेले फटाक्यांमुळे आग लागण्याची घटना घडली आहे. या घटने दोन कंपन्या जळून भस्मसात झाल्या आहेत.

Virar
fire
(फोटो प्रातिनिधीक आहे)

दिवाळी सणानिमित्त फटाके काळजीपूर्वक फोडणे आवश्यक आहे. फटाके फोडत असतांना झालेल्या दुर्घटनेत वसई विरार येथील दोन कंपन्या जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली. वसईतील रिचर्ज कंपाऊंड परिसरात ही आग लागली. फटक्यांमुळे लागलेल्या आगीत एक केमिकल कंपनी आणि पुठ्ठ्याची कंपनी जळून भस्मसात झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती अग्नीशमन दलाला दिली. माहितीमिळताच अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळावर पोहोचल्या. दीड तासांच्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान जळालेले फटाके कंपनीवर फेकल्यामुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here