‘अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप काढलं बाहेर’

आज वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत एमटीएनएलच्या ८२ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

BANDRA MTNL FIRE
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. (छाया - संदिप टक्के)

वांद्र्याच्या एमटीएनएलच्या इमारतीला दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. या घटनेमुळे येथील कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. स्वत: सोबत दुसऱ्यांचाही जीव वाचवावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. त्यापैकीच काही जणांना आग लागल्याचं कळताच अनेकांनी इमारतीच्या टेरेसवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान पोहचेपर्यंत एकमेकांना सावरत प्रत्येक जण आगीपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. अग्निशमन दलाच्या जवानांना या इमारतीतील कर्मचाऱ्याला वाचवण्यात यश आलं. दुपारी लागलेली आग रात्री ८ वाजेपर्यंत धुमसत होती.

हेही वाचा – एमटीएनएल आगीची चौकशी होणे आवश्यक – आशिष शेलार

निवृत्तीला फक्त ४ महिने शिल्लक

एमटीएनएलमध्ये वर्क असिस्टंन्ट म्हणून गेले ३५ वर्षे काम करत असलेल्या ५९ वर्षीय तेजू कोहली या इमारतीच्या साडे सहा मजल्यावर होत्या. आग लागल्याचं कळताच प्रत्येक जण धावपळ करु लागला. त्यांच्या या ऑफिसरने ९व्या मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्वच जिन्याच्या दिशेने ९व्या मजल्यावर सुखरुप पोहोचले. त्यानंतर, हळूहळू अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्येकाला बाहेर काढलं. गेली ३५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्तीच्या वेळेस अशी वेळ त्यांच्यावर ओढावली, असं तेजू यांनी सांगितलं.

” ३५ वर्षे काम करत असताना पहिल्यांदाच अशी घटना घडली. अग्निशमन जवानांमुळे सुखरुप बाहेर पडलो. निवृत्तील फक्त ४ महिने शिल्लक आहेत. आग लागल्याचं कळताच आम्ही ९व्या मजल्यावर पळालो. लिफ्ट बंद असल्यामुळे जिन्यानेच पळत होतो. त्यानंतर जवांनानी शिडीवरुन खाली उतरवरलं. “
तेजू कोहली, कर्मचारी, एमटीएनएल

पाहा फोटोगॅलरी – मुंबईत वांद्र्याच्या एमटीएनएलमध्ये अग्नितांडव

दोघांवर भाभा हॉस्पीटलमध्ये उपचार

वांद्र्याच्या एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत एकूण ८२ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तर, मदतकार्यासाठी सरसावलेले अग्निशमन जवानांपैकी २ जवानांना वांद्र्याच्या भाभा या पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोघांनाही धुरामुळे गुदमरण्याचा त्रास झाल्याने त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.