घरमुंबईवडाळ्यात भीषण आग; १६ जणांचा श्वास गुदमरला

वडाळ्यात भीषण आग; १६ जणांचा श्वास गुदमरला

Subscribe

वडाळ्यात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीच्या घटनेमध्ये १६ जणांचा श्वास गुदमरला. या सर्व जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन जणांना घरी सोडण्यात आले आहेत तर उर्वरित १४ जणांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या वर्षभरापासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असताना आज पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. वडाळा पूर्व येथील एका इमारतीत आज पहाटे आग भडकली असून या आगीच्या घटनेमध्ये १६ जण गुदमरल्याची माहिती समोर आली आहे. या १६ जणांना केईम रुग्णालयात हलवण्यात आले. यामधील दोन जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १४ जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अशी लागली आग

वडाळा पूर्व येथील श्री गणेश साई इमारतीत आज सकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच ही वेळ झोपेची असल्यामुळे नेमके काय करावे हे देखील कोणाला कळले नाही. आग लागताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे चार अभियंते, रुग्णवाहिका पाण्याचे टँकर घेऊन लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि पुढच्या २० मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

- Advertisement -

श्वास कोंडला

श्री गणेश साई इमारतीमधील पहिल्या मजल्यावर अडकलेल्या १६ जणांचा आगीमुळे श्वास कोंडला असून या व्यक्तींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे श्वास कोंडला आणि गुदमरल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यामधील दोन जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर इतर १४ जणांवर उपचार सुरु आहेत.

या आगीच्या घटनेमध्ये १६ जणांचा श्वास गुदमरला असून त्यातील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन जणांना  एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यातील एक बाळ हे १३ दिवसांचे आहे. तर दोन जणांना वॉर्ड नंबर ३२ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर इतर व्यक्तींना वॉर्ड नंबर २० मध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.  धोंडीबा बुळे, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर 

- Advertisement -

ज्या इमारतीला आग लागली होती. त्या इमारतीमधील एका रुग्णाने जीव वाचवण्यासाटी इमारतीमधून उडी घेतली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केल आहे. त्यांच्यावर सर्जरी करण्याची गरज आहे. डॉ. हेमंत देशमुख, केईएम अधिष्ठाता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -