मुंबईत शुक्रवारी रात्री कुर्ला येथे एका इमारतीला भीषण आग लागली होती. त्यानंतर पहाटे भिवंडी येथे समद नगर परिसरातील एका गोदामात देखील अग्नितांडव पाहायला मिळाले. भिवंडी परिसरात अनेक गोदामे, छोटे कारखाने आहेत. भिवंडीत वारंवार आगीच्या घटना घडत असतात. आज सकाळी येथील एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. या गोदामात पुठ्ठा, कोम, लोचन, कापडाच्या चिंध्या, प्लास्टिक, यंत्रमाग मशीन असे भंगार आगीत जळून खाक झाले आहे पहाटे तीन वाजता ही आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली मनपातील ५ अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या.
सध्या ही आग नियंत्रणात आली असून कुलिंगचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप मिळालेली नाही. या गोदामाच्या जवळच नागरी वस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा – कुर्ल्यात इमारतीला भीषण आग! इमारतीतून स्फोटाचे आवाज!
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आगा
आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜನವರಿ 24, 2020