मुंबई – अंधेरीतील साकीनाका परिसरात भीषण आग

fire broke out in Sakinaka area of Andheri
मुंबई - अंधेरीतील साकीनाका परिसरात भीषण आग

मुंबईतील अंधेरी येथील साकीनाका परिसरात भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. साकीनाका मधील खाडी नंबर ३ येथील झोपडपट्टीत ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूला झोपटपट्टीचा परिसर असल्यामुळे आग पसरण्याचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नामुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

आज सकाळी साकिनाका परिसरातल्या झोपडपट्ट्यांनी ही मोठी आग लागली आहे. माहितीनुसार या ठिकाणी १० ते १२ झोपट्या आहेत. १० झोपडपट्ट्यांमधील आग आटोक्यात आली आहे. पण जीवतहानी होण्याची मोठ्या शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत ७ ते ८ झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग लेव्हल २ची असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या युद्धपातळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या ठिकाणी असलेल्या अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलासमोर अडचण निर्माण होत आहे.


हेही वाचा – मुंबईकरांनी करून दाखवलं! गेल्या १५ वर्षांतलं सर्वात कमी ध्वनी प्रदूषण!