कुर्ल्यात इमारतीला भीषण आग! इमारतीतून स्फोटाचे आवाज!

Mumbai
kurla building fire

कुर्ला परिसरातल्या बर्वे मार्गावर एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मेहताब को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं या इमारतीचं नाव आहे. आंबेडकर नगर परिसरात कुर्ला पश्चिमेकडे ही इमारत आहे. रात्री ९ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. सुरुवातीला इमारतील्या तळमजल्यापर्यंतच असलेली ही आग हळूहळू आधी इमारतीच्या पहिल्या आणि नंतर दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या ७ गाड्या, २ शिघ्र प्रतिक्रिया वाहन, ६ जंबो टॅकर्स, एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली, याची निश्चित माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, इमारतीच्या आतून स्फोटांचे आवाज येत असून सिलेंडरचे ब्लास्ट होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग! इमारतीतून स्फोटाचे आवाज!

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग! इमारतीतून स्फोटाचे आवाज!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜನವರಿ 24, 2020