घरमुंबईप्रभादेवीत ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगला भीषण आग

प्रभादेवीत ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगला भीषण आग

Subscribe

मुंबईत अग्नितांडव थांबायचे नाव घेत नाहीये. मुंबतल्या प्रभादेवी भागातल्या ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होते. मात्र वाऱ्यामुळे आग पुन्हा भडकली. सध्या आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीमध्ये अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपराचासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रभादेवीतील ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगच्या ३२ व्या आणि ३३ व्या मजल्यावर आज दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या २० गाड्या,५ वॉटर टँकर आणि २ अॅम्ब्युलन्स आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागलेल्या फ्लॅटचे मालक सध्या अमेरिकेत आहेत. या आगीमध्ये ३२ व्या आणि ३३ व्या मजल्यावरील अनेक फ्लॅटचे मोठे नुकसान झाले.

ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहेत. आगीमुळे बिल्डिंगमधील लिफ्ट बंद करण्यात आल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या समोर आग विझवण्याचे मोठं आव्हान आहे. या आगीमध्ये अद्याप जिवितहानी झालेली नाही. आग लागताच बिल्डिंगमधील सर्व मजले खाली करण्यात आले. तर ९५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

- Advertisement -

प्रभादेवीतील ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंग १० ते १२ वर्ष जुनी आहे. या बिल्डिंगमध्ये सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचे फ्लॅट आहेत. ब्ल्यूमॉन्ड बिल्डिंगच्या २६ व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोनचे घर आहे. २०१० साली दीपिकाने या बिल्डिंगमध्ये घर विकत घेतले होते. दीपिका पदुकोनने बिल्डिंगला लागलेल्या आगप्रकरणी ट्विट केलं आहे. “मी सुरक्षित आहे. तुमच्या सर्वांचे आभार. आपलं आयुष्य धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी प्रार्थना करुया” असं ट्विट दीपिकाने केलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -